sunil darekar and prajyot todkar criticism for Mayor Vaibhav Khedekar 
कोकण

"गरज सरो, वैद्य मरो, ही खेडेकरांची कार्यपद्धती" 

गोविंद राठोड़

खेड (रत्नागिरी) :  नगराध्यक्ष वैभव खेडेकर म्हणजे 'गरज सरो आणि वैद्य मरो' अशा पद्धतीने काम चालवतात. त्यांच्या कामकाजाची पद्धतच ही आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व तत्कालीन पालकमंत्री यांच्या माध्यमातून निधी आणायचा व त्यांच्यावरच टीका करायची. निधी आणायचा आणि उलट्या बोंबा मारायच्या, हे नगराध्यक्षांचे रूप खेडच्या जनतेने पाहिलेले आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर व गटनेते प्रज्योत तोडकरी यांनी पत्रकार परिषदेत केली. 
दरेकर म्हणाले, खेड पालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना वैभव खेडेकर यांनी मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी भीक मांगो आंदोलन केले होते. आता त्या आंदोलनाचे नेमके काय झाले? आजतागायत हे नाट्यगृह खुले झालेले नाही.

पालकमंत्र्यांनी मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटींचा निधी दिला आहे. मागील तीन वर्षांपासून हा निधी का पडून आहे, या प्रश्नांची उत्तरे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी द्यावीत. या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, बांधकाम सभापती सुरभी धामणस्कर, समाजकल्याण सभापती रुपाली खेडेकर, महिला बालकल्याण उपसभापती मनीषा निर्मळ, सीमा वंडकर, आरोग्य सभापती प्रशांत कदम, नम्रता वडके, महिला व बालकल्याण सभापती अल्पिका पाटणे उपस्थित होते. 

बदलून घेतलेली कामे योग्य 
खेड पालिकेच्या विकासकामांसाठी पालकमंत्री अनिल परब यांनी दिलेला 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी खेड पालिकेबाहेर पाठवलेला नाही. फक्त विकासकामे बदलली आहेत, याचे आत्मपरीक्षण वैभव खेडेकर यांनी करायला हवे, असा सल्ला देऊन शिवसेना नगरसेवकांनी पत्र देऊन जी कामे बदलून घेतली आहेत, ती अतिशय योग्य आहेत, अशी ठाम भूमिका मांडली. 

सुनील दरेकर म्हणाले... 
तत्कालीन पालकमंत्र्यांनी ठाकरे उद्यानासाठी दिला 70 लाख निधी 
उद्यानाच्या कामाचा ठेका कोणत्या ठेकेदाराच्या नावावर आहे ? 
प्रत्यक्षात येथे कोण काम करत आहे, याचे उत्तरही नगराध्यक्षांनी द्यावे 
नगराध्यक्ष खेडेकर यांचे उपोषण हे प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : अवघ्या 30 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! मुळशी तालुक्यात सिक्युरिटी गार्डचा Heart Attack ने दुर्दैवी मृत्यू; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Butterfly Bridge: ‘बटरफ्लाय’ पुलाचे खुणावतेय सौंदर्य; महापालिकेतर्फे चिंचवडमध्ये उभारणी, रोषणाईचे आकर्षण

Inspirational Army Journey : गुगलवरही शोधता न येणाऱ्या गावातली पोरगी लेफ्टनंट बनली, ८ वेळा अपयशावर मात; सांगलीच्या 'स्वरुपा'ची जबरा कहाणी

Youth Mental Health Crisis: तरुणांमध्ये वाढतेय मानसिक आजारांचे प्रमाण; चिंताजनक अहवाल आला समोर

Viral Video: योगा करत होती महिला तितक्यात घडला निसर्गाचा चमत्कार, पाहा मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT