कोकण

Loksabha 2019 : अनंत गीतेची केवळ आश्‍वासनेच

सकाळवृत्तसेवा

दाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा मतदारसंघातील यापूर्वीचे उमेदवार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आश्‍वासनांपलीकडे काहीही केलेले नाही, त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असे मत रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

दापोली शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘दापोली तालुक्‍यात पर्यटन विकास, रोजगार निर्मिती, विकासकामे, उद्योगधंदे, शैक्षणिक अभ्यासक्रम, उद्योगांची निर्मिती करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये बुध्दिमत्ता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी तसेच मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना पुणे किंवा मुंबईला जावे लागते. हा सर्व प्रकार खर्चीक असल्याने अनेक युवक या परीक्षेला सामोरे जात नाहीत. त्यामुळे आपण या तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थानिक पातळीवर उभारणी करणार आहोत.

पर्यटनदेखील कोकणचे महत्त्वाचे अंग बनले आहे. मात्र रस्ता, पाणी, वीज या पायाभूत सुविधा येथे कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे पर्यटक अधिक दिवस कोकणात घालवत नाहीत. याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होत असून पर्यटन उद्योगाला पोषक वातावरण निर्मिती आणि पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्याला आपण प्राधान्य देऊ. जल पर्यटनासारख्या नव उपक्रमांना पाठबळ देऊन रोजगार निर्मितीवर आपला भर राहील. 

एनजीओच्या माध्यमातून प्रशिक्षण
येथे जहाज बांधणी, जहाज तोडणी तसेच दिघी पोर्ट आदी उद्योग आपल्या मतदारसंघात आले आहेत. भविष्यात असे उद्योग येथे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. येथे काम करण्यासाठी कोकणात प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. या उद्योगांमध्ये काम करण्यासाठी कोकणातील युवकांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. ते काम आपण एनजीओच्या माध्यमातून सुरू करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT