कोकण

सोमय्यांची तक्रार अन्`त्या` रिसॉर्टची मंत्रालयाकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीनुसार आज ता. ५ रोजी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल या मंत्रालयाच्या नागपूर कार्यालयातील अधिकारी ए. सुरेशकुमार यांनी, मुरुड येथील सीआरझेड कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेल्या रिसॉर्टची पाहणी केली. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड समुद्रकिनाऱ्याजवळ खरेदी केलेल्या व नंतर उद्योजक सदानंद कदम यांना विकलेल्या जागेत बांधलेल्या रिसॉर्टबाबत यापूर्वी केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या मंत्रालयाचे अधिकारी यांनी मुरुड येथे येऊन या रिसॉर्टची पाहणी केली होती. (suresh-kumar-resort-violation-of-crz-act-at-murud-kokan-marathi-news)

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, केंद्रीय वन व पर्यवरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मुरुड येथील सीआरझेड कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेल्या एकूण १० बांधकामाची तक्रार केली होती. आज वन व पर्यावरण मंत्रालयाचे नागपूर कार्यालयातील अधिकारी ए. सुरेश कुमार यांनी तक्रार करण्यात आलेल्या बांधकामाची पाहणी केली तसेच समुद्राच्या उच्चतम भरती रेषेपासून या बांधकामाचे अंतर किती आहे, याची मोजणीही केली तसेच या बांधकामाचे छायाचित्रही काढले.

मुरुड येथील रामदास शेलार, विशाल परदेशी, रत्नाकर खोत, उमेश जोशी, रामचंद्र रेवाळे, सदानंद बोवणे, अरविंद शिंदे यांच्या बांधकामाची पाहणी आज करण्यात आली. दापोलीचे प्रांत शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर, तलाठी संदीप देवघरकर, पाटील या वेळी उपस्थित होते.

अहवाल केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे...

आज केलेल्या पाहणीचा अहवाल केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. या अहवालावर वन व पर्यावरण मंत्रालयालाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

Mahajyoti Skill Scam: महाज्योती बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महाज्योतीमध्ये ३०० कोटींचा 'कौशल्य विकास' घोटाळा?

SCROLL FOR NEXT