surprise checking of four wheeler car in for new year start from sawantwadi sindhudurg
surprise checking of four wheeler car in for new year start from sawantwadi sindhudurg 
कोकण

काळ्या काचा असणाऱ्या गाड्यांची होणार आता सरप्राईज तपासणी

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : नववर्ष स्वागतानिमित्त गोव्यातून होणाऱ्या दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सरप्राईज तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. तशा सूचनाही पोलिस अधीक्षकांना देण्यात आल्या असून काळ्या काचा असणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी केली जाणार असल्याचे कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी  सांगितले.

आंबोलीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी तेथे पोलिस ठाणे उभारण्यासाठी निधी उपलब्ध नाही. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे, पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीस मोहिते आले आहेत. त्यांनी येथील पोलिस ठाण्याची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, निरीक्षक स्वाती यादव, सहायक निरीक्षक शशिकांत खोत आदी उपस्थित होते. 

मोहिते म्हणाले, ‘‘गोव्यातून पुणे, नाशिक, सोलापूर आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बनावटीची अवैध दारू वाहतूक होते. ते रोखण्यासाठी यापुढे दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली सरप्राईज पोलिस तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अशी दारू वाहतूक रोखणार आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनाही त्यांची ड्यूटी सरप्राईजरित्या समजणार आहेत. दर आठ तासांनी ड्यूटी बदलणार असून अचानकपणे ड्यूटी लावण्यात येणार आहे. गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिस एकमेकांकडे बोटे दाखवत असले तरी असे गुन्हे रोखणे दोघांनी बंधनकारक आहे. यापुढे अवैध दारू वाहतूक, त्यातून घडणारे गुन्हे मोडीत काढण्यासाठी विशेष मोहीम घेवू. गांजा, चरस विक्रीसारख्या गुन्हेगारीवर विशेष लक्ष असून गोव्यातील कनेक्‍शनबाबत यापुढे वेगळे पथकच लक्ष ठेवून राहणार आहे.’’ 

माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीत पोलिस ठाणे उभारण्यासंदर्भात घोषणा केली होती. त्या संदर्भात त्यांनी विचारले असता ते म्हणाले, 'आंबोली आणि बांदा येथे नव्याने ठाणे उभारण्याबाबत हालचाली आहे; मात्र कोरोना पार्श्‍वभूमीवर येत्या काळात निधी उपलब्ध होईल त्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. आंबोलीमध्ये वर्षा हंगामामध्ये ड्यूटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून पाच मोटारी व चार दुचाकी वाहने देण्याचा निर्णय झालेला आहे.' चोऱ्यां, घरफोडीसारखे गुन्हे उघडकीस येत आहेत; मात्र यावर आळा घालण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे मोहिते म्हणाले.

‘त्या’ हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाई

खुनी हल्ल्यामध्ये ट्रक चालक मृत्यूप्रकरणी चंदन ऊर्फ सनी अनंत आडेलकर व अक्षय अजय भिके या दोन्ही संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाईची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. त्यातील आडेलकरवर पॉस्को अंतर्गत असलेला गुन्हा व अन्य गुन्हे लक्षात घेता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT