कोकण

गावखडीतील सुरुबनाची धूप

CD

२६ (पान ५ साठी, अॅंकर)

-rat१५p२४.jpg-
२४M८३८८०
गावखडी (ता. रत्नागिरी) ः गावखडी किनाऱ्यावरील सुरू बनाची दयनीय अवस्था झाली असून समुद्राचे आक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे.
------------

गावखडी समुद्रकिनाऱ्यावर सुरु बनाची धूप

लाटांच्या तडाखा ; धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी, प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर सुरु बनाची धूप थांबविण्यासाठी समुद्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्यामध्ये सुरू बनावर समुद्राच्या लाटांचा जोरदार मारा होऊन नष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे तातडीने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून या किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी सुरू बनाची लागवड करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा झाला होता, परंतु त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे समुद्र लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे या भागातील अनेक झाडे कोलमडून पडले आहेत. काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी झाडे तोडून नेली आहेत. त्यामुळे या भागाचे लाटांच्या तडाख्याने धूप होत आहे. गेल्यावर्षी वादळी पावसाचा मोठा तडाका बसला होता. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो, प्रस्ताव पाठवा असे सांगितले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. परंतु त्याचे साधे भूमिपूजन अद्याप झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा वादळी पाऊस व समुद्र लाटांच्या तडाख्याने सुरू बन नष्ट होण्याची भीती आहे. सुरु बन नष्ट झाल्यास समुद्र आत घुसून लोकवस्तीला धोका निर्माण होणार आहे.

आठ कोटींच्या निधीची चर्चा
धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात कामाच्या हलचालीही झाल्या नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

Akola DPDC : अकोला विद्युत भवनासमोर कॉन्ट्रॅक्टरचा राडा; वर्कऑर्डर वाटपात अनियमितता, चौकशीची मागणी

Solar Rooftop Tax: छतावरील सौरऊर्जेवरील कराचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्या; अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलनाचा इशारा – दीपिका चव्हाण

Raigad: नांदगावात सापडले राजा हंबीरराव यांच्या अस्तित्वाची खुण, १४व्या शतकातील शिलालेख; फोटो समोर

DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

SCROLL FOR NEXT