survey of MSEDCL under the connection of cable in guhagar ratnagiri 
कोकण

गुहागर : शृंगारतळीत वीजवाहिन्यांचे जाळे भूमिगत होणार

सकाळ वृत्तसेवा

गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेतील वीजवाहिन्यांचे जाळे भूमिगत (अंडर ग्राऊंड केबलींग) करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला आहे. तीनपदरीकरणाच्या कामाच्यावेळी भूमिगत वाहिन्यांचे काम महावितरणला पूर्ण करावे लागेल. 

आठवडाभरापूर्वी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये आमदार भास्कर जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तीनपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार, व्यापारी आणि जनता अशी एकत्रित सभा झाली होती. या सभेमध्ये शृंगारतळी बाजारपेठतील वीजवाहिन्यांबाबत चर्चा झाली. त्या वेळी आमदार जाधव यांनी सभेतूनच महावितरणचे कार्यकारी अभियंता लवेकर यांच्याजवळ दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यामध्ये बाजारपेठेतील वीजवाहिन्या जमिनीखालून नेण्याबाबत चर्चा झाली.

महावितरण सर्व्हे करून निर्णय घेईल, असे लवेकर यांनी आमदार जाधव यांना सांगितले होते. याच अनुषंगाने महावितरणची टीम शृंगारतळीमध्ये सर्व्हेसाठी आली होती. गुहागर महावितरणचे अभियंता गणेश गलांडे, अभियंता कलशेट्टी यांनी हा सर्व्हे केला. या वेळी पंचायत समिती उपसभापती सुनील पवार, सरपंच संजय पवार, शिवसेनेचे विभागप्रमुख अनंत चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, शहरप्रमुख नरेश पवार, ग्रा. पं. सदस्य अमरनाथ मोहिते, सत्यप्रकाश चव्हाण, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते. 

आराखडा, अंदाजपत्रक बनवणार

याबाबत महावितरणचे गलांडे म्हणाले, बुधवारी (२५) केलेला सर्व्हे प्राथमिक होता. यावेळी ग्रामपंचायत, व्यापारी यांच्याकडून आलेल्या सूचना, महामार्गावरून गेलेल्या वीजवाहिन्यांची संख्या, बाजारपेठेत विजेचे खांब, ट्रान्सफार्मर, हाय व्होल्टेज वाहिन्या कुठे आहेत, याची माहिती घेतली. पुन्हा सर्व्हे करून प्रत्यक्षात हे काम कसे करता येईल, याचा विचार करून आराखडा आणि खर्चाचे अंदाजपत्रक बनवले जाईल. याचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांकडे आम्ही पाठवणार आहोत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या घटनास्थळी दाखल

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SCROLL FOR NEXT