Dog Sakal
कोकण

रत्नागिरीत २१ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोग केल्याचा अंदाज

रत्नागिरी शहरामध्ये एका रात्रीत २१ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली.

- राजेश शेळके

रत्नागिरी - शहरामध्ये एका रात्रीत २१ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणी प्राणीमित्राने शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दिली असून प्राण्यांना क्रुरतेने वागवीणे अधिनियम १९६० चे कलम ११ (जी) (टी) प्रमाणे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कुत्रांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, विषप्रयोग करून कुत्र्यांना मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे प्राणीमित्र संतप्त असून सनिल उदय डोंगरे (वय २३, रा. गोडाऊन स्टॉप, नाचणे ) या प्राणीमित्राने याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काल एका ठिकाणी कुत्रा मेल्याचे दिसून आले. त्यानंतर पुढे गेलो तर आणखी काही कुत्री मेल्याचे दिसले.

शहरातील आरोग्य मंदिर, मजगाव रोड, गोडबोले स्टॉप, पटवर्धन वाडी आदी परिसरात शोध घेतला असता २१ उनाड कुत्र्यांच्या मृत्यू झाल्याचे दिसू आले. या कुत्र्यांना खाण्यासाठी चिकन, भात ठेवलेला दिसून आला. याबाबत सनिल डोंगरे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. कुणीतरी अज्ञाताने कुत्र्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये कोणतेतरी विषारी औषध टाकून ते कुत्र्यांना खाण्यास दिले. त्यामुळे २१ कुत्रे मयत झाल्याचे डोंगरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याचसोबत आणखी सुमारे ३० कुत्रे बेपत्ता असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली आहे. पोलिसांनी हि घटना गांभीर्याने घेऊन तपास सुरु केला आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत या कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. तर त्यांच्या खाण्यामध्ये विषप्रयोग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रासायनिक परिक्षणानंतर नेमके कोणते विष घातले ते स्पष्ट होईल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शवविच्छेदनानंतर या कुत्र्यांची पुरुण विल्हेवाट लावण्यात आली.

सर्वपित्री आमावस्या असल्याने या भागातील अनेक घरांसमोर पित्रांना नैवैद्य ठेवला जातो. त्यामुळे अनेक घरांसमोर भात, वडे, दहीभात, आदी खाद्यपदार्थ दिसून आल्याने नेमके कुठे-कुठे कोणता पदार्थ खाऊन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे शोधण्यात अडथळा आहे. पोलिस या प्रकरणाची कसुन चौकशी करती आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT