कोकण

कोलगावातील युवकाचा संशयास्पद मृत्यू

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी -  कोलगाव कसेलवाडी (ता. सावंतवाडी) येथील रोहित रामचंद्र राणे (वय २४) याचा मृतदेह आज अणाव दाबाचीवाडी तलावात आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले; मात्र यामागे घातपात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. रोहित रविवार (ता. ७)पासून बेपत्ता होता, असे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे.

कोलगाव कसेलवाडी येथील रोहितने होडावडा (ता. वेंगुर्ले) येथील मामाच्या गावी स्वतःचे घर बांधले आहे. तो तेथेच राहायचा. तो पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मामाच्या मुलाची दुचाकी (एमएच ०७ - एडी ०१५७) घेऊन निघाला होता. मामाकडील लोकांना वाटले, की तो आपल्या वडिलांकडे म्हणजे कोलगाव कसेलवाडीला गेला असेल. वडिलांना वाटले तो मामाकडेच असेल.

आज सकाळी अणाव दाबाचीवाडी तलावाजवळ जनावरे घेऊन गेलेल्या व्यक्तींना एक मृतदेह तरंगताना दिसून आला. यानंतर शुभम राठीवडेकर याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर हा प्रकार रोहितचे वडील व मामाकडील लोकांना कळला.

रोहित, ओरोस आयटीआयकडील हॉटेल मॅनेजमेंटचा माजी विद्यार्थी आहे. तो काही दिवस पुणे येथे नोकरीला होता. सध्या तो होडावडा येथे मामाकडे बांधलेल्या घरात राहत होता. वडील कोलगाव येथील मूळ घरी राहून मोलमजुरी करतात. अणाव दाबाचीवाडी तलावाशेजारी रोहित याने आणलेली दुचाकी आढळून आली आहे. त्याच्यावर रोहित याने शूज, पॉकेट ठेवले होते. त्याच्या अंगावर मारहाण झाल्याचे कोणतेही व्रण आढळून आलेले नाहीत. रोहितचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर रोहितचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT