symbolic statue of Shiv Sena MP Vinayak Raut was cremated by BJP in Lanza political sindhudurg marathi news 
कोकण

कोकणात भाजप आक्रमक: विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे  केले दहन

रवींद्र साळवी

लांजा (सिंधुदुर्ग) : कोकणचे नेते, खासदार नारायण राणे तसेच माजी खासदार व भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याबाबत अपशब्द काढणाऱ्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे लांजा तालुका भाजपाच्या वतीने आज दहन करण्यात आले.
        

 शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणचे नेते खासदार नारायण राणे तसेच माजी खासदार व भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचा निषेध केला जात आहे. तर भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले असून खासदार विनायक राऊत यांना जशासतशे उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज लांजा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील पक्ष कार्यालयासमोर खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच राऊत यांचा जोरदार निषेध करण्यात आला. राणे साहेब आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, नेत्या उल्का विश्वासराव, जिल्हा चिटणीस हेमंत शेट्ये, ओबिसी सेलचे शहराध्यक्ष अशोक गुरव, वासूदेव राणे, शेखर सावंत, नगरसेवक संजय यादव, माजी उपनगराध्यक्ष रवि कांबळे, शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नगरसेवक मंगेश लांजेकर, जिल्हा चिटणीस यशवंत वाकडे, नाना शेट्ये,आदींसह अन्य भाजपी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT