कोकण

शैक्षणिक पायाभूत सुविधांचा लाभ घ्या

CD

89168

शैक्षणिक पायाभूत सुविधांचा लाभ घ्या

नीलेश राणे ः सावंतवाडीत सकल मराठा समाजतर्फे गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी जीवनात वाया न जाता शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती करा. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, असे आवाहन माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केले.
सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (ता. ९) यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या महादेव भाटले स्कूलच्या सभागृहात आयोजित केला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, युवराज लखमराजे भोसले, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा उद्योजक विशाल परब, सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, भोसले इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य गजानन भोसले, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, विलास जाधव, राघोजी सावंत, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, दिगंबर नाईक, यशवंत आमोणकर, सुंदर सावंत, संयुक्ता गावडे, तारकेश सावंत, सुंदर गावडे, संजय लाड, विनोद सावंत, अजय सावंत, अमित परब, साईश गावडे आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे १७५ यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
श्री. राणे पुढे म्हणाले, ‘‘जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती साधली पाहिजे. जगासमोर आपली ओळख निर्माण करून देताना आई-वडिलांच्या मेहनतीला सलाम करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत राहा. मराठा समाजाची बाजू घेणे, आंदोलन करणे आणि समाजासाठी काम करत राहणे, हे साधेसोपे नाही. अध्यक्ष सीताराम गावडे हे सतत कार्यरत राहून भूमिका मांडत आहेत. खासदार नारायण राणे यांनी मराठा समाजाला प्रमाणपत्र दिले, तेच आजही सुरू आहे. त्यांनी मराठा समाजाला एकत्र करून आरक्षणावर भूमिका मांडली आहे. समाजात काम करीत असताना प्रामाणिकपणा आणि थेट समाजाची बाजू घेणारे खूप कमी आहेत. तुम्ही समाजासाठी काम करीत राहा, मी तुमच्या पाठिशी आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिले तरच ते आपल्या आवडत्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात पुढचे पाऊल विचार करून टाकणे गरजेचे आहे. ध्येय निश्चित करून यश मिळवा आणि आई-वडिलांच्या कष्टांचे सार्थक करा. थोरामोठ्यांची चरित्रे वाचा आणि जीवनमूल्ये निर्माण करा. सावंतवाडी तालुका सकल मराठा समजाच्या प्रत्येक उपक्रमास माझे पूर्ण सहकार्य राहील.’’ प्रास्ताविक, स्वागत अध्यक्ष गावडे यांनी केले. जय भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
..........
चौकट
यशस्वी जीवनासाठी क्रियाशील राहा
संजू परब यांनी, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगितले व परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी इतिहास वाचला, तो जीवनात कधीही अपयशी ठरणार नाही, असे ते म्हणाले. युवराज लखमराजे भोसले यांनी, दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील काळात स्पर्धा परीक्षांतही सहभाग घेऊन यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला. विशाल परब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना यशस्वी जीवनासाठी सतत क्रियाशील राहा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT