Koyna Dam
Koyna Dam esakal
कोकण

टाटा पॉवरच्या अधिकार्‍यांचा पोफळीत तळ

मुझफ्फर खान

चिपळूण : खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या कोयना प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी टाटा पावर कंपनीच्या पथकाने पोफळी येथे तळ ठोकला आहे त्यामुळे कोयना प्रकल्पाचे खासगीकरण होणार हे आता निश्चित झाले आहे.

जलसंपदा विभा .गाने कोयना प्रकल्पाची उभारणी केल्यानंतर पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाकडे हा प्रकल्प चालविण्यासाठी भाडेतत्त्वावर हस्तांतरित करण्यात आला होता. 2005 मध्ये महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे त्रीभाजन होऊन महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण अशा तीन कंपन्या अस्तित्वात आल्या यातील महानिर्मिती कंपनीच्या अधिपत्याखाली कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू आहे. केंद्र सरकारच्या सध्याच्या धोरणानुसार सरकारी प्रकल्पांचेही खाजगीकरण केले जात आहे.

महाराष्ट्रातील 27 पैकी सहा विद्युत प्रकल्पांचे सध्या खासगीकरण होणार आहे. त्यात कोयना धरण पायथा विद्युत ग्रह आणि कोयनेचा तिसरा टप्पा खाजगी कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास कामगार संघटना आणि सामान्यांकडून उद्रेक होईल या भीतीने जलसंपदा विभागाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. कोयना प्रकल्पाचे खासगीकरण होणार नाही अशी सारवासारव महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री करत असले तरी टाटा पॉवर कंपनीने कोयनेच्या या दोन प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

टाटा कंपनीतील कार्यकारी अभियंता या उच्च पदावरील त्रिसदस्यीय पथक सध्या पोफळीत तळ ठोकून आहेत. हे वरिष्ठ अधिकारी पोफळीतील महाजनकोचे कार्यालय, तिसरा टप्पा आणि कोयना धरण पायथा विद्युत गृहाला भेट देऊन तांत्रिक माहिती तपासत आहेत. आहे. या दोन प्रकल्पाचे नूतनीकरण व अधुनिकीकरण करून परीचालन करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर खाजगी प्रवर्तकास देण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

देशातील वीज प्रकल्पांच्या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी सरकार त्या प्रकल्पांचा प्रकल्प अहवाल तयार करते. देशातील अनेक वीज प्रकल्पांचा प्रकल्प अहवाल टाटा पॉवर कंपनीने तयार करून तो सरकारला दिला आहे. कोयनेच्या परिसरात वीज प्रकल्पाची उभारणी करणे शक्य आहे की नाही याचा प्रकल्प अहवाल 1952 मध्ये टाटा कंपनीने तयार करून तो केंद्र सरकारला दिला होता. कोयनेचे दोन टप्पे टाटा चालवण्यासाठी घेणार की त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून शासनाला देणार हे अद्याप निश्‍चित झालेले नाही.

टाटा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोफळी येथे आल्यानंतर त्यांना आवश्यक असलेली माहिती आमच्या कार्यालयाकडून दिली जात आहे.कार्यालयाकडून दिली जात आहे

संजय चोपडे मुख्य अभियंता पोफळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT