कोकण

संकेत वादळाचे: मच्छीमारांची उडाली धावपळ; घेतला खाड्यांचा आसरा

राधेश लिंगायत

हर्णे (रत्नागिरी) : गेले दोन दिवसांपूर्वीपासूनच शासनाचा ' तौक्ते ' वादळाचा (Tauktae cyclone) संदेश आल्यानंतर मच्छीमारांची एकच धावपळ उडाली आहे. १५ मे व १६ मे या दोन तारखा दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याकडे (Rtanagiri) सरकण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून मच्छिमारांना व किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा संदेश आल्यामुळे मच्छीमारांनी सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणच्या खाड्यांचा आसरा घेऊन नौकांच पलायन केलं.

Tauktae cyclone ratnagiri update marathi news

वादळाच्या सतर्कतेचा संदेश मिळाल्याने हर्णे बंदरातील नौकांनी आंजर्ले, जयगड, दाभोळ(रत्नागिरी), दिघी(रायगड) खाडीत आसरा घेतला आहे. गेल्यावर्षी निसर्ग वादळ जून महिन्यात आलं होतं त्यावेळी नौकां शेकरण्याचं काम मच्छीमारांचे आटोक्यात आलं होतं. तरीही भयंकर रुद्र रूपच ते वादळ असल्यामुळे भरपूर नौकांच नुकसान झालं होतं. त्याच भीतीपोटी मच्छीमारांनी धावपळ सुरू केली.

दरम्यान, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग ८० किमी पर्यंत जाणार असल्याचा संदेश हवामान खात्या कडून मिळाल्यामुळे मच्छिमारांनी घाबरून मासेमारीला ब्रेक लावला. निसर्ग वादळाच्या भरमसाठ नुकसनानंतर जो तो स्वतःला सावरत या उद्योगामध्ये उभा रहात होता. काही उभे राहिले तर काही थांबले. आणि नंतर मात्र फास्टर नौका व एलईडी नौकांच्या अवैध मासेमारीने पारंपरिक मच्छीमाराला मेटाकुटीस आणले आहे. अशाही परिस्थितीत हर्णे बंदरातला मच्छीमार आपला उद्योग करत होता. यावर्षी मासेमारीचा हंगाम पाहिजे तसा मिळालाच नाही. नुकतेच अखेरचे दिवस आले असताना मासळी बऱ्यापैकी मिळू लागली होती पण व्यवस्थित दर मिळत नव्हता. आणि त्यातच हे तौक्ते वादळ येऊन ठेपल.

वादळ किती परिणामकारक असेल याचा विचार करत बसण्यापेक्षा नौका सुरक्षित ठिकाणी हलवणे हिताचे ठरेल याचाच विचार करून बहुतांशी बाहेर मासेमारीकरिता गेलेल्या १५० नौकांनी दिघी , १२० नौकांनी जयगड, ५० ते ६० नौकांनी दाभोळ, तर ७०० ते ८०० नौकांनी किमान आंजर्ले खाडीपासून ते किमान ५ किमीच्या अंतर म्हणजे पाटीलवाडी पर्यंत वादळापासूनच्या सुरक्षिततेसाठी आसरा घेतला आहे.

वादळ येणार म्हणून आज (ता.१४) दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांनी संवेदनशील भागांमध्ये भेट देऊन सतर्क राहण्यास सांगितले. दापोली पोलीस यंत्रणा देखील आजपासूनच कार्यरत झाली असल्याचे दिसून आले.

Tauktae cyclone ratnagiri update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT