कोकण

सिंधुदुर्गात 'तौक्ते'चा सर्वाधिक फटका वैभववाडीला

एकुण 40 घरांसह 2 गोठ्यांचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्गनगरी : 'तौक्ते' चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) जिल्ह्यात (sindhudurg) सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (disaster management) कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी (vaibhavwadi) तालुक्यात एकूण 27 घरांचे नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी झाड पडले असून 2 शांळांचे, एका स्मशान शेडचे आणि एका शेळीपालन शेडचे नुकसान झाले आहे. एक विद्युतपोलही वैभववाडी तालुक्यात पडला आहे.

इतर तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. दोडामार्ग तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे. तर पाच झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात 2 घरांचे नुकसान झाले असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. तर 4 ठिकाणी झाडे पडली आहेत. तसेच एका ठिकाणी विद्युत खांबही पडला आहे. मालवण तालुक्यात 2 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका पत्र्याच्या शेडचे नुकसान व एक विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 9 घरांचे, एका गोठ्याचे, एका शाळेचे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणी झाडे पडली आहेत. देवगड तालुक्यात एका घराचे नुकसान झाले असून 2 ठिकाणी झाडे कोसळली असून एका ठिकाणी विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT