कोकण

Cyclone Update: Tauktae ची वाटचाल गुजरातच्या दिशेने

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) : अरबी समुद्रावर (Arabian Sea)घोंगावणार्‍या चक्रीवादळाने (tauktae cyclone)आपला मोर्चा गुजरातच्या (Gujrat)दिशेने वळवला असला तरी सिंधुदुर्गात (Sindhudurg)मुसळधार पावसाचा कहर अद्यापही सुरू आहे. गेल्या चोवीस तासात किनारपट्टीसह काही तालुक्यात सरासरी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सध्यातरी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी पावसाने पाणी साचल्याची माहिती पुढे आली आहे.

tauktae cyclone update Sindhudurg recorded an average rainfall of 200 mm kokan marathi news

आज सकाळी आठ वाजता जिल्हा आपत्ती कक्षात नोंदवलेल्या माहितीनुसार कणकवली 192 , मालवण 290, वेंगुर्ला 180 आणि कुडाळ मध्ये 203 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरे, गोठे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. याबाबत महसूल पातळीवर पंचनामे सुरू आहेत.मात्र, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंदच्या स्थितीत आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती कक्षा कडून प्राप्त झाली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील घरांचे नासधूस लक्षात घेता बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेबरोबरच घर दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने अर्थात हार्डवेअर, सिमेंट, फरशी विक्रेत्यांना दुकान सुरू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी यांनी आजपासून दिली आहे. ही दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याचेही एका आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT