Teacher out WhatsApp group education officials 
कोकण

शिक्षकांनी ग्रुप सोडला, शिक्षणाधिकाऱ्यांविरूद्धच्या भूमिकेला वेगळे वळण

विनोद दळवी

सिंधुदुर्गनगरी -  प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याविरोधात शिक्षकांनी घेतलेल्या भूमिकेला आज आणखी वेगळे वळण लागले. शासनाचे आदेश व परिपत्रके सर्व शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी काढलेल्या व्हॉट्‌सअप ग्रुपमधुन जिल्ह्यातील 3854 शिक्षक, केंद्रप्रमुख आज बाहेर पडले. 

प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी तयार केलेल्या व्हॉट्‌सअप ग्रुपमध्ये केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षक यांचा समावेश होता. या ग्रुपवर गेल्या वर्षभरात शासनाचे अनेक आदेश, परिपत्रके, याचबरोबर स्वतःचे आदेश तयार करून या ग्रुपवर पाठविण्यात येत होते. या ग्रुपवरील काही आदेश हे एकाधिकारशाहीने काढले जात असल्याचा शिक्षक संघटनांचा आरोप आहे. या कारभाराविरोधात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत याविरोधात जिल्हा परिषदेसमोर काल (ता.24) आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधले होते.

याच आंदोलनावेळी तीव्र संताप व्यक्त करत सर्व शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या या व्हॉट्‌सअप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज जिल्ह्यातील 94 केंद्रप्रमुख यासह 3854 शिक्षक सामुहिकरित्या ग्रुपमधून बाहेर पडले आहेत. या जिल्ह्यातून शिक्षणाधिकारी आंबोकर यांची बदली होत नाही तोपर्यंत त्यांनी एकाधिकारशाहीने काढलेल्या कोणत्याही आदेशचे पालन केले जाणार नाही. सकाळी 10ः30 ते 4ः30 या वेळेत कोणी शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाही. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शाळेचे कामकाज रोज 4 तास करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात येईल, असा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

Pachod Accident : हळदीचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या मावसभावाचा दूचाकी धडकून मृत्यू

Marriage Rules: महाराष्ट्रात लग्नाचे नियम बदलणार! लग्नपत्रिकेत वर-वधुची जन्मतारीख बंधनकारक होणार? बालहक्क आयोगाची मोठी शिफारस

SCROLL FOR NEXT