teachers start its corna testing in ratnagiri dabhol after 348 antigen test only 1 woman teacher report positive in dabhol 
कोकण

कोरोना चाचण्यांसाठी शिक्षकांची गर्दी ; ३४८ अँटीजेन टेस्टमध्ये १ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : राज्यातील शाळा सुरू करण्याच्या पार्श्‍वभूमीवर दापोली तालुक्यात शिक्षकांच्या अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे काम दापोली शहरात आरोग्य विभागाकडून सुरू आहे. अँटीजेन टेस्टसाठी शिक्षकांची मोठी गर्दी होत आहे. 17 नोव्हेंबरपासून  348 अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक वगळता सगळ्या निगेटिव्ह आल्या आहेत. 

19 आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. 
शिक्षकांच्या अ‍ॅटीजेन टेस्टमध्ये एका महिला शिक्षकेची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून या शिक्षिका खेड येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात काम करतात अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी दापोलीत चाचणी केली होती. मात्र त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. दापोली शहरातील केळसकर नाका येथील दापोली नगरपंचायतीच्या इमारतीमधील फिव्हर क्लिनिकमध्ये तालुका आरोग्य विभागाकडून या टेस्ट करण्याचे काम सुरू आहे.

अँटीजेन टेस्टसाठी शिक्षकांची मोठी गर्दी आहे. यासाठी दोन एएनएम, एक मेडिकल ऑफिसर, डॉक्टर, फार्मासिस्ट आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. 17 नोव्हेंबर पासून  348 अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्या सगळया निगेटिव्ह आल्या आहेत. 19 आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल आलेले नाहीत. दरम्यान, दापोली येथील सीसीसी सेंटरमध्ये सध्या एक कोरोना बाधित रुग्ण तर डीसीएचसी सेंटरमध्ये एकूण 4 कोरोना बाधित आणि  2 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: उकाडा दूर होणार, मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार; आएमडीचा सतर्कतेचा इशारा

Amravati: फ्रेजरपुरा हादरला! १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा गंभीर आरोप; अमरावतीत खळबळजनक घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

रोज सकाळी फक्त १०० उड्या मारा; शरीरात दिसतील असे बदल की तुम्हीही थक्क व्हाल, यास्मिन कराचीवालांचा खुलासा

Light Bill Saving Tips : रात्रभर AC, फॅन चालवूनही वाढवणार नाही वीजबिल; वापरुन पाहा 'या' 7 पैकी एक ट्रिक

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

SCROLL FOR NEXT