temple donation box thief in ratnagiri kokan marathi news 
कोकण

या पठ्ठ्याने चोरली चक्क मंदिरातील दानपेटी अन्....

सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी ) : मंदिरातील दानपेटी जंगलात नेऊन फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केल्याची घटना पूनस-कोंड येथे घडली आहे. या चोरट्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मंगेश मनोहर पत्याने (वय ३०, रा. पूनस कोंड), असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पूनस कोंड येथे ब्राम्हण देवाचे देऊळ आहे. या देवळामध्ये लोखंडी दानपेटी होती. शिमगोत्सवाला ही दानपेटी उघडण्यात येते. साधारण वर्षाकाठी या दानपेटीमध्ये दहा हजारांचे दान जमा होते. 

पूनस कोंड येथील मंगेश मनोहर पत्याने (वय ३०) हा काहीच काम धंदा करीत नसल्याने व त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याला आर्थिक चणचण होती. मंगेशने गुरुवारी रात्री मंदिरातील दानपेटी चोरली व जंगलात नेऊन फोडली. त्यातील रोख रक्कम पळविली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाडीमध्ये चर्चा होती. 

मंगेशने दिली उडवाउडवीची उत्तरे ​
दरम्यान, मंगेश हा कामधंदा करत नसल्याने त्याच्याकडे पैसे आले कुठून असा प्रश्‍न येथील ग्रामस्थांना पडला होता. वाडीची बैठक झाली. त्यावेळी देखील मंगेशने उडवाउडवीची उत्तरे दिली. शिमगोत्सवाला चाकरमानी गावी आल्यानंतर या चोरीविषयी पुन्हा खुलासा करण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात आली; परंतु काहीच तोडगा न निघाल्याने अखेर पूनस कोंड येथील ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी लांजा पोलिस ठाण्यात मंगेशविरोधात फिर्याद दिली. विजय भिकाजी लाखण या ग्रामस्थांनी फिर्याद दिली. त्यानंतर मंगेशला रात्री उशिरा अटक झाली. बुधवारी मंगेशला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : पारंपारिक पोशाखात महिला, तरुण तरुणींनी काढली महाडमध्ये शोभा यात्रा

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT