ten computer batteries theft oros high school 
कोकण

संगणकाच्या दहा बॅटऱ्या चोरीस गेल्याने खळबळ

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमधील संगणक कक्षेच्या पाठीमागील खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी संगणकाच्या दहा बॅटऱ्या लंपास केल्या. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये हायस्कूलचे सुमारे 60 हजारांचे नुकसान झाले आहे. चोरटा स्थानिक असल्याचा अंदाज सातार्डा पोलिसांनी वर्तवल्याचे संस्था उपाध्यक्ष बाळा परब यांनी सांगितले. 

कोरोना पार्श्‍वभूमीवर आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे नववी व दहावी वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास देत असताना इंटरनेटमध्ये कनेक्‍शन मिळत नाही म्हणून लिपिक तानाजी खोत व शिपाई शेळके यांनी संगणक कक्ष उघडला असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची कल्पना मुख्याध्यापक विद्याधर देसाई, संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना दिली. त्यांनी पाहिले असता संगणक कक्षाच्या खिडकीचे दोन लोखंडी गंज तुटलेले होते.

या घटनेची माहिती सातार्डा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व चोर स्थानिक असावा, असा अंदाज व्यक्त केला. अधिक तपास सातार्डा पोलिस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच परब यांनी पाहणी केली व चोरट्यास तत्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT