Ten villages ratnagiri covered area
Ten villages ratnagiri covered area 
कोकण

साखरतरसह दहा गावे कोरोनाबाधित क्षेत्र ; कडक पोलिस बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - तालुक्यातील साखरतरमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी मंगळवारी (ता. 7) रात्रीपासून साखरतरसह 3 किमी आणि बफर झोनमध्ये येणाऱ्या सुमारे 10 गावांचा भाग कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. परिसर निर्जंतुकीकरण करण्यापासून लोकांची तपासणी आणि माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


तालुक्यातील साखरतर गावातील एक महिला कोरोना बाधित असल्याचे अहवालावरून आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरवात झाली. साखरतरपसह 3 किमी क्षेत्र कोरोना बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले. या क्षेत्रात साखरतर, कासारवेली, काळबादेवी, बसणी, म्हामुरवाडी, केळ्ये (काही भाग), मजगाव, शिरगाव, मिर्‍या, आडी हे भाग येतात. या परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या क्षेत्रात प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित व्यवसाय बंद ठेवण्यात आली आहेत. निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाबाधित महिला गावातील ज्या डॉक्टरांकडे गेली होती, त्या डॉक्टर्ससह डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती प्रशासनाने घेतली आहे. साखरतरमध्येच वास्तव्यास असताना त्या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

संपर्कात आलेल्यांमध्ये भिती 

साखरतर येथील कोरोना बाधित महिला अनेक व्यक्तींच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर ती खासगी रुग्णालयात काही दिवस दाखल होती असेही बोलले जात आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची भितीने गाळण उडाली आहे. मात्र त्यांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करत पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT