dipak kesarkar sakal media
कोकण

जिल्हा बँक हडपण्याचा होता डाव; दीपक केसरकर

दडपण झुगारून अध्यक्षांकडून बँक सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची, गोरगरिबांची बँक आहे. ही बँक गिळकृंत करण्याचा काहीचा प्रयत्न होता. तशा पद्धतीचे पावले टाकली जात होती. अनेकांनी बँकेच्या अध्यक्षावर दडपण आणले; परंतु दडपण झुगारून सतीश सांवत यांनी बँक सुरक्षित ठेवली आणि शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि महिला वर्गाकरिता विविध योजना राबविल्या. त्यामुळे येत्या निवडणुकीत १९ ही जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा आत्मविश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँक निवडणुक, नगरपंचायत निवडणूक प्रचाराकरिता आमदार श्री. केसरकर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक, मंगेश लोके, दिगंबर पाटील, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. आमदार श्री. केसरकर म्हणाले, "महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणुक लढविली जात आहे. शिवरामभाऊ जाधव, डी. बी. ढोलम यांनी मिळविलेल्या नावलौकीकात जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष श्री. सांवतानी भर घालण्याचे काम केले. कोणतेही चुकीचे काम करणार नाही, अशी भुमिका त्यांनी कायम ठेवली.

या बँकेतून चुकीच्या पध्दतीने कर्ज घेऊन बँक गिळकृंत करण्याचा प्रयत्न काहीनी सुरू केला होता. त्या कामांसाठी श्री. सांवतावर दबाव देखील टाकण्यात आला; परंतु त्यांनी तो दबाव जुगारून काम करीत बँक सुरक्षित ठेवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या आणि संचालक मंडळाच्या हातात बँक सुरक्षित आहे. गेल्या पाच वर्षात अतिशय प्रभावीपणे काम सांवत यांच्या नेतृत्वाखाली काम बँकेने केले आहे. तळागाळातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवुन त्यांनी योजना राबविल्या.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT