kokan sakal
कोकण

शाळेची घंटा वाजणार; उद्यापासून पहिली-चौथीचे वर्ग होणार सुरू

मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांची संमती अत्यावश्यक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना बाधित कमी झाल्यामुळे पहिली ते चौथीचे वर्गही सुरु करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार शाळांमधील सुमारे ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्यापन १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. बंद शाळांमधील किलबिलाट सुमारे दोन वर्षांनी सुरु होणार आहे. मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांची संमती अत्यावश्यक करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात ८ वी ते १२ वीचे वर्ग १० ऑगस्टपासून सुरु करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु केले. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने बंद असलेल्या पहिली ते चौथीच्या शाळांही सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी कोरोना संसर्गापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सोमवारी (ता. २९) याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात केली जाणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गटशिक्षणधिकाऱ्‍यांना सूचना दिलेल्या आहेत. पालकांच्या बैठका घेऊन शाळा उघडण्यास सांगण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन शासनाच्या आदेशाचे काटेकोरपण पालन करावयाचे आहे. तालुकापातळीवर कार्यवाही केली जात आहे. व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने काही जिल्हा परिषद शाळांच्या कामकाजाला आरंभ झाला आहे.

या सूचनांचे पालन अत्यावश्यक

शाळा निर्जंतुकीकरण करणे, हात धुण्यासाठी व्यवस्था करणे, तापमापक उपलब्ध करुन देणे, वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्‍या वाहनांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांची शाळेत जाण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक केले आहे. दोन लस घेतलेल्या शिक्षकांसह कर्मचाऱ्‍यांना शाळेत प्रवेश द्यावा. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT