कोकण

मनसेच्या खेडेकरांचे स्टेटस् चर्चेत

CD

‘मनसे’च्या खेडेकरांचे
स्टेटस आले चर्चेत

खेड ः मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचं स्टेटस चर्चेत आला आहे. आम्ही काम केलेले दोन्ही खासदार केंद्रात मंत्री होणार आहेत. म्हणून अभिनंदन अशा आशयाचे स्टेटस वैभव खेडेकर यांनी ठेवलेला आहे. नारायण राणे आणि सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, असे खेडेकर यांचं भाकित आहे. याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

------------

बॅंक ऑफ इंडियामध्ये
समझौता दिवस

रत्नागिरी ः बँक ऑफ इंडियातर्फे येत्या बुधवारी (ता. १२) देशभरातील तिच्या सर्व शाखा आणि एफजीएमओमध्ये वनटाइम सेटलमेंट ओटीएसअंतर्गत कर्जदारांच्या एनपीए कर्जखात्यांची पूर्तता करण्यासाठी समझोता दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. समझोता दिवस विशेषत: अशा एनपीए कर्जदारांसाठी तयार करण्यात आला आहे. जे कर्जदाराच्या व्यवसायातील स्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही खऱ्या कारणामुळे कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. आमच्या बँकेकडे लहान किमतीची खाती आणि मध्यम आकाराची खाती सेटल करण्यासाठी विशेष ओटीएस योजना आहेत ज्या द्वारे ज्या कर्जदारांची खाती एनपीए आहेत त्यांना विशेष आणि चांगल्या सवलती दिल्या जातात. ग्राहकांनी एनपीए कर्ज खाती सेटल करण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंक ऑफ इंडियातर्फे करण्यात आले आहे.

---------

बौद्ध कर्मचारी संघटनेतर्फे
मनुस्मृती विरोधात निवेदन

खेड ः मनुस्मृतीमधील आक्षेपार्ह श्लोक शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत न करण्याबाबत निवेदन खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांस बाधा आणणाऱ्या मनुस्मृती या विषारी ग्रंथातील श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे म्हणजे पवित्र आणि विषमताविरहित राज्यघटनेतील अनुच्छेदांची पायमल्ली करणे होय. या विषमतावादी अन्यायकारक श्लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा कलंकित होणार आहे. हे टाळण्यासाठी तहसील व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा अंतर्भाव न करता मनुस्मृतीस स्थान देण्यात येऊ नये, अशी शासनास विनंती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT