theft in ratnagiri rupees 3 lakh rupees gold theft from thief in ratnagiri 
कोकण

सासरवाडीला जाणं पडलं चक्क साडेतीन लाखाला

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील छत्रपती नगर, साळवी स्टॉप येथील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्याने ११ तोळे सोन्यासह ३ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ ते २४ नोव्हेंबरला दुपारी सव्वाच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीधर राजाराम सावंत (वय ६२, रा. छत्रपतीनगर, राव बंगला, साळवी स्टॉप, रत्नागिरी) हे पत्नीसह १६ नोव्हेंबरला भाऊबीज असल्याने कसोप येथे पत्नीच्या माहेरी कुटुंबासह गेले होते. त्यानंतर ते मंगळवारी रत्नागिरीत परतले. मात्र, लगेचच पत्नीला घेऊन डॉक्‍टरकडे गेले होते. ते दुपारी घरी आले, त्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आतील खोल्यांचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता, कपडे व साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले होते तर खिडकीचे गज कापलेले होते. घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आज प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सहा हजाराची रोकड असा ३ लाख ४८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी श्रीधर सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT