There will be electricity in Hirlok area konkan sindhudurg 
कोकण

सुखद! हिर्लोक पंचक्रोशीवासीयांचा अंधार होणार कायमचाच दूर

अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील हिर्लोक पंचक्रोशीतील पावसाळ्यात अंधारात असणारी गावे आता कायमची उजळणार आहेत. आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यानंतर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगाव येथून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या हिर्लोक पंचक्रोशीत रांगणा तुळसुली, किनळोस हिर्लोक, नारूर, गिरगाव, कुसगाव या गावांत वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या कडावल येथून डिगसच्या जंगल भागातून येत असल्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. पावसाळ्यात तर या गावांत कायमच चार चार दिवस वीज गायब होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह जनमानसावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी वीजेबाबतची समस्या कायमच श्री. परब यांच्याकडे व्यक्त केली होती. मागच्या जूनमध्ये मुसळधार पावसामुळे या भागात आठ दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. सर्व गावे अंधारात होती. संतप्त ग्रामस्थांनी आमदार नाईक व श्री. परब याच्या नेतृत्वाखाली राज्य विद्युत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांची सर्व कार्यकर्त्यांसमावेत भेट घेतली होती.

यावेळी श्री. परब यांनी हिर्लोक पंचक्रोशीची ही विजेची समस्या आक्रमकपणे मांडल्यानंतर श्री. पाटील यांनी ती तातडीने सोडविण्याचे मान्य केले. याकडे श्री. परब यांनी विद्युत वितरण कंपनीकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर त्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून माणगावातून आलेली 11 केव्हीची विद्युत वाहिनी घावनळे ते हिर्लोकला जोडण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या विद्युत वाहिनीमुळे रांगणातुळसुली, हिर्लोक, किनळोस, नारूर, गिरगाव व कुसगाव ही सर्व गावे कायमची उजळणार आहेत. 

विजेचा प्रश्‍न सुटणार 
मंगळवारी (ता.14) विद्युत वाहिनी मार्गाची श्री. परब यांनी विद्युत महावितरणचे श्री. सावंत व अन्य कर्मचारी, ठेकेदार कंपनीचे हर्षित यांच्या समवेत पाहणी करून सर्व्हे केला. यावेळी रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, हिर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे, कुडाळ तालुका आत्मा कमिटी सदस्य बाजीराव झेंडे उपस्थित होते. त्यांनीही याबाबत सूचना मांडल्या व आवश्‍यक माहिती दिली. श्री. सावंत यांनी 15 दिवसांत हे काम पूर्ण करून लोकांच्या सेवेत रुजू करू, असा शब्द उपस्थितांना दिला. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

Morning Breakfast Recipe: प्रथिनेयुक्त नाश्ता बनवायचा असेल तर मुगापासून बनवा हा खास पदार्थ, अगदी सोपी आहे रेसिपी

Shiva Shakti Temple: भारताची एकमेव जागा जिथे शिव आणि शक्ती एकत्र दर्शन देतात, कुठे आहे हे पवित्र स्थळ पहा

SCROLL FOR NEXT