Olive Ridley Turtle esakal
कोकण

Olive Ridley Turtles : रत्नागिरीत तब्बल 48 हजार 192 कासवं झेपावली समुद्रात; सोळा किनाऱ्यांवर 896 घरट्यांचं जतन

समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे (Olive Ridley Turtles) अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात.

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच ठिकाणी कासव संवर्धन केले जाते. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात.

रत्नागिरी : जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे (Olive Ridley Turtles) अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांचे संवर्धनही केले जाते. यंदा जिल्ह्यात एकूण १६ किनाऱ्यांवर ८९६ घरट्यांचे संवर्धन करण्यात वन विभाग, कासव मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. त्या घरट्यांमध्ये ८८ हजार ३१२ अंडी होती. त्यातील ४८ हजार १९२ कासवांना समुद्रात सोडण्यात आले. यंदा उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे काही अंशी त्याचा परिणाम झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

यंदा जिल्ह्यातील आंजर्ले, केळशी, कर्दे, मुरूड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, गुहागर वरचा पाठ, तवसाळ, गावखडी, माडबन, व्येत्ये, मालगुंड, भाट्ये बीच या सोळा किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी आली होती. त्याची नोंद वनविभागाकडे (Forest Department) झाली आहे. पूर्वी कासवे किनाऱ्‍यावर अंडी घालून गेल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ अंडी शोधून ती खाण्यासाठी वापरत किंवा कोल्हे, कुत्रे ही अंडी फस्त करीत. परंतु वनविभागाकडून कासवसंवर्धन मोहीम राबवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक कासव मित्र पुढे आले. त्यामुळे कासव बचाव मोहिमेला वेग आला.

अगदी मच्छीमारांच्या जाळ्यात आलेली कासवेही पुन्हा समुद्रात सोडण्यात येऊ लागली आहेत. त्याचे फायदे दिसू लागले असून यावर्षी अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची संख्या वाढली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच ठिकाणी कासव संवर्धन केले जाते. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. त्यानंतर ४० ते ५० दिवसांच्या अंतराने या अंड्यातून पिले बाहेर पडतात. यंदा जिल्ह्यातील सोळा किनाऱ्यांवर ८९६ घरट्यांचे संवर्धन करण्यात आले. त्यामध्ये ८८ हजार ३१२ अंडी होती.

त्यातील आतापर्यंत ४८ हजार १९२ कासवांचे संवर्धन करण्यात आले आहे. अंड्यांच्या तुलनेत ५५ टक्के कासवांचे संवर्धन झाले आहे. सर्वाधिक गुहागर येथे २१ हजार ३६१ अंड्यांपैकी ११ हजार ५९८ अंड्यांचे संवर्धन झाले. तर गावखडीत १४ हजार ७२८ पैकी ८ हजार ९४६ अंड्यातून कासवं बाहेर पडली. दरम्यान, यंदा मार्चच्या आणि एप्रिलच्या सुरुवातीला उष्णतेचा फटका कासवाच्या अंड्यांना बसला. वाळूत हे संवर्धन होत असल्यामुळे वाळू तापल्याने मागील वर्षीपेक्षा यंदा वीस ते तीस टक्के अंडी अधिक खराब झाली.

समुद्र किनारी भागात यंदा कासवांचे मोठ्याप्रमाणात आगमन झाले होते. त्यामुळे घरट्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उन्हापासून अंड्यांचे संरक्षण करण्यात काही अंशी यशही आले. त्यामुळे कासव संवर्धन मोहिमेला सकारात्मक बळ मिळाले आहे.

-राजश्री किर, परिक्षेत्र वन अधिकारी

रत्नागिरी जिल्ह्यात कासव संवर्धन

तालुका किनारे घरटी अंडी पाण्यात सोडलेली कासवं

  • दापोली ८ २७१ २६८७९ १०५११

  • गुहागर ३ ३३८ ३४५०० २१६१०

  • रत्नागिरी ५ २८७ २६९३३ १६०७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT