three boy drowned in the Pimpali canal in chiplun 
कोकण

चिपळूणात पाण्याच्या मोठ्या प्रवाहात तो गेला वाहून ; दोघांना वाचविण्यात आले यश...

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील पिंपळी येथील कॅनाल मध्ये पिंपळी बुद्रुक बौद्धवाडीतील तीन युवक बुडाले त्यातील दोघांना वाचविण्यात यश आले.मात्र एकजण बुडाला आहे. त्याचा शोध सुरू आहे याबाबत  पिपळी सरपंच तंबीटकर यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली.

पिंपळीच्या कॅनालमध्ये तिघेजण बुडाले 


पिंपळी बुद्रुक येथील 10 ते 12 मुले शुक्रवारी दुपारी 4 .30 दरम्यान कनॉल मध्ये पोहोयला गेली होती जवळपास 20 ते 22 वयाचे हे तरुण पोहण्याचा मस्त आनंद लुटत होते काही जण पोहून कनॉल बाहेर पडले इतक्यात पाण्याचा एक मोठा प्रवाह आला आणि प्रविण प्रकाश सावंत,पारस अनिल सावंत व दीपक तुलसीराम मोहिते हे तिघेजण बुडू लागले आणि एकच आरडा ओरडा सुरू झाला स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ते पाण्यात हात पाय हलवू लागले.

दोघांना वाचविण्यात यश एकजण बुडाला

 पारस सावंत यांनी झाडाची वेल पकडली तर दीपक मोहिते यांनी कनॉलचा कडफा पकडला आणि बाकीच्या मुलांनी त्यांना हात देऊन पाण्याचा बाहेत काढले त्यामुळे दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र पाण्याचा मोठ्या प्रवाहात प्रवीण सावंत हा वाहत गेला आणि बुडाला त्यामुळे त्याला वाचविण्यात यश आले नसले तरी त्याचा शोध अद्याप सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट ! सियाला केतनसोबत लोहगडावर जायचे नव्हते, पण... आईचा मोठा दावा

Music Benefits: गाण्यामुळे मनाला का मिळते एवढी शांतता ? जाणून घ्या,'म्युझिक थेरपी'मागचं विज्ञान...

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT