Moti Lake fishing 
कोकण

सावंतवाडी : मोती तलावातील मासेमारीतून तीन लाख उत्पन्न

सावंतवाडी पालिका; पाळणेकोंडमध्येही उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : येथील पालिकेच्या मोती तलावातून (Moti Lake)येणाऱ्या माशांमुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. चार महिन्यांत तब्बल तीन लाख एवढे उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले. त्यासाठी पालिकेला कुठल्याही प्रकारचा देखभाल खर्च न करता हे उत्पन्न मिळत आहे.येथील पालिकेकडून पाळणेकोंड धरण आणि आणि मोती तलाव या दोन ठिकाणी तयार होणारे मासे विकले जातात. त्यातून दरवर्षी पालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. अलिकडच्या काळात पालिकेकडून मोती तलावातील माशांचा(fishing) ठेका एका एजन्सीला दिला आहे. बांदा येथील स्थानिक एजन्सी तलावातील मासे पकडून ते पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात विकते. यासाठी प्रति किलोमागे ठरलेल्या दराप्रमाणे पालिकेला पैसे भरते. गेल्या पाच महिन्यांमध्ये मोती तलावातील कटला आणि तिलापिया (Katla and Tilapia fish)या दोन जातीच्या माशांपासून पालिकेला तब्बल तीन लाख एवढे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

संबंधित ठेका घेतलेली एजन्सी, माशांना खाद्य देण्यापासून तलावात मत्स्यबीज सोडण्याचे काम स्वतः करते. यासाठी येणारा खर्च संबंधित एजन्सी उचलत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला माशांच्या वाढीसाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही. सद्यस्थितीत दोन वर्षासाठी बांदा येथे एजन्सीला मोती तलावातील माशांचा ठेका दिला आहे. गेल्या चार महिन्यात तब्बल चार ते पाच वेळा या ठिकाणी मासेमारी करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष मच्छिमार या ठिकाणी आणून तलावातील मासे पकडले जातात. पाण्यात थर्माकोलच्या आधारे तरंगत हे मासे पकडले जातात. सध्या मोती तलावांमध्ये मासेमारी सुरू असून पकडण्यात आलेले माशांचे वजन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सायंकाळी दरदिवशी केले जाते.

या ठिकाणी तिलापिया हा मासा जवळपास एक किलोच्या आसपास असतो, असे मच्छीमार यांच्याकडून सांगण्यात आले. पकडण्यात आलेले हे मासे पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा भागात विकले जातात. हॉटेल व्यवसाईक तसेच अन्य मच्छी खवय्ये हे मासे विकत घेतात. पुणे, इंदापूर, बारामती, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, सांगली, सातारा आदी भागात या माशाला मोठी मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.

पालिकेला भरघोस उत्पन्न

मोती तलावात सोडण्यात आलेला कटला व तिलापिया या दोन मासाला वेगवेगळे दर आहेत. कटला या माशाला किलोमागे ५२ रुपये दर संबंधित एजन्सी पालिकेला देते तर तिलापिया या माशाला १८ ते २० रुपये दर पालिकेला मिळतो. एकूणच मोती तलावातील माशाच्या उत्पत्तीपासून पालिकेच्या उत्पन्न मोठ्या प्रमाणात भर पडते.

कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणातूनही पालिकेला दरवर्षी फायदा होतो. या धरणाचे पाणी पिण्यासाठी तसेच इतर कशासाठी वापरले जात असल्याने या ठिकाणी वर्षातून एकदाच मासेमारी केली जाते.

- भाऊ भिसे, पाणीपुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT