three people raped a girl ins sindhudurg they balkmailed her and rapped 
कोकण

तरुणीचे अश्लील चित्रफीत काढून दिली धमकी आणि तिच्यावर तिघांनी केला अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात बलात्कार, विनयभंग, पोक्‍सो, माहिती तंत्रज्ञानअंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू होती. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्‍यातील एका गावातील पीडित मुलीची गावात झालेल्या कार्यक्रमात एकाने एका तरुणाशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या दोघांचे फेसबुक, व्हॉट्‌सॲपवरून चॅटिंग सुरू झाले. कालांतराने त्यांचे प्रेम जुळले. दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले असता ती दुपारी मित्र भूषण शरद माडये (वय २२, रा. तारकर्ली) याच्यासोबत गाडीवर बसून तालुक्‍यातील एका रिसॉर्टवर गेली. यावेळी भूषण याने प्रथमेश ढोलये (२४, रा. धुरीवाडा) व केशव ध्रुवबाळ फोंडबा (२४, रा. सर्जेकोट) यांना बोलावून घेतले. यानंतर भूषण माडये, प्रथमेश ढोलये या दोघांनी त्या मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. केशव फोंडबा याने लगट करत विनयभंग केला. या दरम्यान, प्रथमेश याने व्हिडिओ शूटिंग करत हे व्हिडिओ गुगल व व्हॉट्‌सॲपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी आज पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलिस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांच्या पथकाने संशयितांचा शोध घेत तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. संशयितांच्या विरोधात बलात्कार, विनयभंग, पोक्‍सो, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांविरोधात रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती. पोलिस निरीक्षक संध्या गावडे तपास करत आहेत. 
अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील, कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी पोलिस ठाण्यात भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली आणि तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ज्या रिसॉर्टवर हा प्रकार घडला त्याची कसून चौकशी करावी, यात रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत त्याचा पर्दाफाश करण्याची मागणी पीडित मुलीच्या पालकांनी तुषार पाटील यांच्याकडे केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT