Three students stranded at Kota take bus to reach to Sindhudurg 
कोकण

कोटा येथे अडकलेले तीन विद्यार्थी सिंधुदुर्गात दाखल.....

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : शिक्षणासाठी राजस्थान राज्यातील कोटा येथे गेलेले परंतु लॉकडाऊनमुळे तेथेच अडकलेले जिल्ह्यातील तीन विद्यार्थी शनिवारी रत्नागिरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले होते. या अडकलेल्या मुलांसाठी राज्य शासनाने राजस्थान सरकारशी चर्चा करून आज त्यांना एसटीने जिल्ह्यात सुखरूप दाखल केले. त्यामुळे या मुलांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले आहेत.

पालकांनी मानले शासनाचे आभार ​

 राज्यातील अनेक मुले राजस्थान येथील कोटा येथे शिक्षणाला गेली होती. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १९ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ मुलांचा समावेश होता. कोरोना या पूर्ण जगाला हादरवुन सोडणाऱ्या कोरोना विषाणुने भारतात शिरकाव करीत जोरदार पाय पसरण्यास सुरुवात करताच केंद सरकारने २२ मार्च रोजी पूर्ण देशात लॉकडाऊन जाहिर केले. तत्पूर्वी सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन जाहिर केल्याने व शाळा, कॉलेज बंद केल्याने ही मुले तिथेच अडकली होती. या अडकलेल्या मुलांना आपल्या गावी घेवून या, अशी मागणी मुलांच्या पलकांनी शासनाकडे लावून धरली होती.

मुले एसटीने राज्यात दाखल

प्रसार माध्यमांनी सुद्धा हा विषय लावून धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थान मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे चर्चा करीत ही मुले महाराष्ट्रात पाठविण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने या मुलांना एसटीने राज्यात आणून त्यांना आपाआपल्या जिल्ह्यात सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांची तेथे आरोग्य तपासणी करून त्यांना एसटीने जिल्ह्यात आणण्यात आले. जिल्ह्यात दाखल झाल्यावर या मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. अडकलेल्या मुलांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत राज्य शासनाचे मुलांच्या पलकांनी आभार व्यक्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT