Minor Girl esakal
कोकण

Ratnagiri Crime : लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सोअंतर्गत तिघांना अटक

अल्पवयीन मुलीला तीन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

सकाळ डिजिटल टीम

घराच्या मागे व पीडिता आंघोळ करत असताना तिचा मोबाईलवर व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले आहेत.

रत्नागिरी : तालुक्यातील अल्पवयीन मुलीला तीन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी जयगड पोलिसात (Jaigad Police) तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. यज्ञेश अनंत धनावडे, प्रतीक संतोष ताम्हणकर, रूतिकेश रवींद्र शिंदे अशी संशयितांची नावे आहेत.

ही घटना १९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा व दिवा मुंबई, साठरेबांबर येथे घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. या प्रकरणी फिर्यादी यांनी जयगड पोलिसात तक्रार दिली.

तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(जे) ३७६ (२) (एन) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ९ (एल) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. संशयितांनी घरी सोडण्याचा बहाणा करून शारीरिक संबंध ठेवल्याचे गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे.

तर, २०१८ ला त्याच्या घराच्या मागे व पीडिता आंघोळ करत असताना तिचा मोबाईलवर व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT