three tourist in malgund beach ratnagiri for swimming one dead and two tourist safe ratnagiri 
कोकण

दैव बलवत्तर म्हणून वाचला दोघांचा जीव ; एकाचा मात्र खोल पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी आलेल्या ठाणे-कल्याण येथील तिघा मित्रांपैकी एका तरुणाचा मालगुंड समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. उर्वरित दोघेजणं सुरक्षित आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव तुषार शरद दळवी (वय ३४, रा. कल्याण-ठाणे) आहे. जयगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेखर आप्पा राजे (वय ३४), अमितेश त्रिपाठी (वय ३२) आणि तुषार दळवी (तिघेही रा. कल्याण जि. ठाणे) हे तिघे मित्र शनिवारी सकाळी श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. दिवसभर गणपतीपुळे येथील एका लॉजला ते वास्तव्यास होते.

गणपतीपुळे परिसर फिरल्यानंतर दर्शन घेऊन तिघेही शांत अशा मालगुंड-गायवाडी येथील समुद्रकिनारी आले. गणपतीपुळे किनाऱ्यावर गर्दी असल्यामुळे ते मालगुंड किनारी आले होते. ते तिघेही शांत समुद्रात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही खोल समुद्रात ओढले जाऊ लागले. दरम्यान, तुषार खोल पाण्यात बुडाला होता. ही माहिती समजल्यानंतर मालगुंड पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक श्रीमती पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल सरगर यांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. 

ग्रामस्थांच्या मदतीने तुषारला पाण्याबाहेर काढण्यात आले. उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

 ..तोपर्यंत उशिर झाला होता

शेखर आणि अमितेश हे दोघे जिवाची बाजी लावून पाण्यातून सुरक्षित बाहेर आले; परंतु तुषार दळवी खोल पाण्यात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी दोघांनीही आरडाओरडा केला. किनाऱ्यावर गर्दी नसल्यामुळे वेळेत मदत पोचू शकली नाही. हा प्रकार लक्षात आल्याने जवळच असलेल्या ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तोपर्यंत उशिर झाला होता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT