Tiware Dam 
कोकण

Ratnagiri Dam Mishap : तलाठ्यांनी दिला होता गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागले. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.

चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान 23 ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. यात किमान 23 ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान 23 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे. ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे त्या गावांत सुमारे 3 हजार इतकी लोकवस्ती आहे. आतापर्यंत तीन मृतदेह हाती लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT