Today New 16 Corona Positive Patient Found In Ratnagiri 
कोकण

सावधान ! रत्नागिरी होतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; 16 नवीन रुग्ण

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मागील चोवीस तासात 16 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक 13 रुग्ण रत्नागिरी तालुक्‍यातील आहे. ही रत्नागिरीकरांसाठी चिंताजनक गोष्ट आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 749 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस सापडलेल्या नवीन रुग्णांमध्ये 10 आरटीपीसीआर चाचणीत तर 6 ऍण्टिजेनमध्ये बाधित आले आहेत. त्यात रत्नागिरी 13, चिपळूण 1, राजापूर 1 रुग्णाचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील रुग्ण संख्या दर दिवशी वाढत आहे.

परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा त्यात भरणा असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. गेल्या चोवीस तासात 263 जणांच्या अहवालापैकी 252 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह अहवालांची संख्या 54 हजार 393 आहे. 13 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 246 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 319 असून जिल्ह्यात बरे होण्याचा दर 94.25 टक्के आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT