today state education achievement survey in Raigad district to understand the education sector and student mind sakal
कोकण

Raigad News : शैक्षणिक क्षेत्रातील स्थिती समजण्यासाठी रायगड जिल्ह्यात आज राज्य शैक्षणिक संपादक सर्वेक्षण

उद्या होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

महाड : विद्यार्थी कोणत्या विषयात हुशार आहेत, कोणत्या विषयात कमकुवत आहेत, कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात मुलांना एखादा विषय अवघड अथवा सोपा वाटतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि राज्य, जिल्हा व तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील स्थिती समजण्यासाठी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३) राज्य शैक्षणिक संपादक सर्वेक्षण (SEAS) केले जाणार आहे.

त्‍याअंतर्गत विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार असून जिल्ह्यातील शाळांमध्ये याची तयारीही पूर्ण झाली आहे. काही विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो तर काहींना तो अतिशय सोपा वाटतो. कित्येकदा मातृभाषा असलेली मराठी विषय देखील बहुसंख्य विद्यार्थ्यांना कठीण जातो. विविध इयत्तेतील विद्यार्थी अशा सोप्या आणि कठीण विषयातून आपले शिक्षण पूर्ण करतात, परंतु यातून मार्ग काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पाया मजबूत राहण्यासाठी व त्यांच्या करिअरच्या दृष्टीने भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात विविध उपाययोजना करीत आहे. शैक्षणिक धोरणे, मूल्यमापन पद्धती व अभ्यासक्रम आखले जात आहेत. अशा विविध मार्गांचा अवलंब करून भावी पिढी तयार व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून हे शैक्षणिक सर्वेक्षण केले जाणार आहे.

एकविसाव्या शतकात जग वेगवान झाले असताना देशाची प्रगती कशी होईल, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. परीक्षेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार असून त्‍यांना आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जे विद्यार्थी एखाद्या विषयात मागे पडतात त्यांची पडताळणी करून त्या दृष्टीने कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहेत.

प्रत्‍येक वर्गासाठी स्‍वतंत्र पेपर

रायगड जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये तिसरी, सहावी व नववीमधील विद्यार्थ्यांसाठी तीन नोव्हेंबरला राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)अंतर्गत परीक्षा घेतली जाणार आहे. मुलांना लेखी प्रश्नपत्रिका दिल्या जाणार असून प्रत्येक वर्गासाठी वेगळा पेपर असेल. यामध्ये विद्यार्थ्यांना भाषा, गणित आणि परिसर अभ्यासक्रम तसेच नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित व समाजशास्‍त्र याविषयी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

विषयनिहाय तपशीलवार विश्‍लेषण

परीक्षांमधून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासली जाणार आहे. प्रत्येक भाग तसेच तालुक्यानुसार कोणती मुले कोणत्या विषयात प्रगत अथवा मागे आहेत, याचाही सर्व्हे केला जाणार आहे. सर्वेक्षणाच्या वयानुसार, राज्यनिहाय, लिंगनिहाय व विषयनिहाय तपशीलवार विश्‍लेषण केले जाणार असून यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये या परीक्षांची तयारी झाली असून विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT