कोकण

१

CD

वास्को ः मुरगाव बंदरात अमोनिया वायू आणलेल्या जहाजावर नियंत्रण ठेवण्यात आले.

वास्को येथे जहाजातून अमोनिया गळती

मुरगाव बंदरातील घटना; अग्निशमन दलाचे नियंत्रण

वास्को, दि. ६ (प्रतिनीधी) : मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या (एमपीए) बंदरातील धक्का क्रं. ८ वर लागलेल्या ''एसटी-ओस्लो'' इंधन जहाजातून अमोनिया वायू काढताना अचानक गळती लागली. जहाजातील अमोनिया वाहीनीतून जवळच असलेल्या ''पॅरादिप प्रासपेट'' आस्थापनाच्या अमोनिया टाकीच्या वाहिनीला जोडताना अमोनिया वायूला गळती लागल्याचे दिसून येताच, तेथे उपस्थित एमपीएच्या अग्निशमन दलाने अमोनिया वायू गळतीवर नियंत्रण आणले. नंतर घटनास्थळी गोवा अग्न्शमन दलाचे जवान, पॅरादीप प्रासपेट आस्थापनाचे अधिकारी, एमपीएचे अधिकारी, मुरगाव पोलिस दाखल झाले.
एमपीए बंदरातील धक्का क्र.८ वर इंधनाची जहाजे लागत असतात. नंतर येथूनच भूमिगत वाहीनीतून सर्व प्रकारचे इंधन जेटी, वास्को, साकवाळ येथील विविध आस्थापनांमध्ये असलेल्या टाकीमध्ये साठवून ठेवतात. मंगळवारी (दि. ६) सकाळी धक्का क्रं.८ वर ''एसटी - ओस्लो पनामा'' अमोनिया वायू भरून आले होते. सर्व ती खबरदारी घेतल्यानंतर या जहाजातील अमोनिया वायू भूमिगत वाहिनीव्दारे बंदरात जवळच असलेल्या, मुरगाव जेटी येथील जुआरी ऍग्रो-पॅरादिप प्रासपेट आस्थापनाच्या अमोनिया वायू टाकित साठवून ठेवली जाते; पण दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जहाजातून अमोनिया वायू वाहीनीतून जाताना अचानक गळती लागली. अमोनिया वायूला गळती लागल्याची कळताच, येथे दिवसरात्र उपस्थित एमपीए अग्नीशमन दलाच्या जवानांनी अमोनिया वायू गळतीवर नियंत्रण ठेवले. नंतर पॅरादिप प्रासपेट, एमपीएचे वरिष्ठ अधिकारी व मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक एलविटोरॉड्रिगीस, पोलिस उपनिरीक्षक यशवंत रायकर,गोवा अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पूर्णपणे अमोनिया वायू गळतीवर नियंत्रण आणण्यात एमपीएच्या अग्नीशमन दलाला यश आले होते. सदर धक्का क्रं.८ वरील एसटी ओस्लो जहाजातील अमोनिया वायू वाहीनीतून जाताना काही प्रमाणात गळती लागल्याने, येथील धोक्याचा सायरन वाजल्याने बंदरात मोठी दुर्घटना घडल्याचे दिसून आले. तो पर्यन्त एमपीएच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी अमोनिया वायू गळतीवर पूर्णपणें नियंत्रण आणण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : "पाच हजारांची मदत म्हणजे जखमेवर मीठ"; दुष्काळी मदतीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT