सांगलीत ऊस दरावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी कडेपूरजवळ उसाचा ट्रक पेटवला..सीजेपीच्या नेत्यांना अटक झाल्यानंतर अभिजीत दिपके आक्रमक झाले आहेत. ते तातडीने नागपूरवरुन दिल्लीला निघाले आहे..सांताक्रूझ येथे मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आणखी दोन दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही दोन दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे..कास : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पुष्प पठारावर यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नैसर्गिक रानफुलांचा अपेक्षित बहर आलेला नाही. पावसाअभावी फुलांच्या वाढीवर व फुलोऱ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याने यंदाचा पुष्प हंगाम अपेक्षेप्रमाणे बहरू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर, कास पुष्प पठाराचा सन २०२६ मधील पर्यटन हंगाम दि. १३ ऑक्टोबर २०२६ पासून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी याची नोंद घेऊन नियोजित भेटीचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन सातारा वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे..माढा : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातोश्री भिवराबाई जयवंत सावंत यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने वाकाव ( ता. माढा जि. सोलापूर) येथे राहत्या घरी मंगळवारी ( ता. १३) रात्री निधन झाले. बुधवारी (ता. १४) सकाळी दहा वाजता वाकाव येथील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आक्का या टोपण नावाने त्यांची संपूर्ण परिसरामध्ये ओळख होती. प्रा. तानाजीराव सावंत हे सकाळी आठ वाजताच वाकावमध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले आहेत..पुणे-बेंगलुरू महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले असून राजू शेट्टी यांनी आंदोलकांसोबत रात्र महामार्गावर काढली. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.