कोकण

शिक्षक समितीतर्फे विविध उपक्रम

CD

शिक्षक समितीतर्फे विविध उपक्रम
तळेरे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी हा बालिकादिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी आपल्या विविध उपक्रमांचा प्रारंभ करणार आहे. या उपक्रमांत दर दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुका महिला आघाडीतर्फे तालुक्याचे एक उत्कृष्ट सादरीकरण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसारित केले जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आठही तालुक्यांचे सादरीकरण साचेबंद न राहता वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक तालुक्यातील बालिका आपली कला सादर करणार आहेत. या नववर्षातील नव्या कल्पनेसह येणाऱ्या उपक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा सरचिटणीस वैभवी कसालकर यांनी केले आहे.
--
देवगडमध्ये गुरुवारी रेकॉर्ड डान्स स्‍पर्धा
देवगड ः जामसंडे येथील साई कॉम्‍लेक्‍स व्यापारी मित्रमंडळाच्यावतीने गुरुवारी (ता. ५) धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्‍ताने तालुकास्‍तरीय खुल्‍या रेकॉर्ड डान्स स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. यातील पाहिल्‍या तीन विजेत्‍यांना अनुक्रमे ३०००, २००० व १००० रुपये रोख बक्षीस आणि प्रत्‍येकी चषक तसेच दोन उत्‍तेजनार्थसाठी प्रत्‍येकी ५०० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याबरोबरच स्‍पर्धेतील १२ वर्षांखालील लहान मुलांमधील उत्‍कृष्‍ट सादरीकरण करणाऱ्या स्‍पर्धकाला बक्षीस दिले जाणार आहे. स्‍पर्धेतील सर्व सहभागी स्‍पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी उद्यापर्यंत (ता. २) संकेत चव्हाण, राजा चिंदरकर किंवा आदित्‍य पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT