कोकण

‘माझे आजोळ’चे भरत भोगटेंना आदर्श समाजसेवक पुरस्कार

CD

72469
भरत भोगटे

‘माझे आजोळ’चे भरत भोगटेंना
आदर्श समाजसेवक पुरस्कार
ओरोस, ता. १ ः बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा शाखेतर्फे प्रा. मधू दंडवते जन्मशताब्दी प्रारंभानिमित्त देण्यात येणारा बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाज सेवक पुरस्कार ‘माझे आजोळ’ वृद्धाश्रमाचे प्रमुख भरत भोगटे यांना जाहीर झाला. २१ जानेवारीला दुपारी तीनला प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दी प्रारंभ कार्यक्रमावेळी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
भोगटे हे मूळ मसुरे गावचे असून मुंबईतील जुन्या पिढीतील काँग्रेसचे नेते रमेश भोगटे यांचे सुपुत्र आहेत. बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी पत्नी व मुलगीच्या स्मृतीप्रित्यर्थ तिरवडे (ता.मालवण) येथे वृद्धांसाठी सहजीवन प्रकल्प सुरू केला. जीवनातील एकटेपणाचा कटू अनुभव गाठीशी बांधीत त्यांनी दुसऱ्याच्या आनंदातून आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून साकारले ‘माझे आजोळ’. कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता एक अभिनव प्रकल्प त्यांनी साकारला. यासाठी त्यांचे बंधू किशोर भिसे यांनी तिरवडे येथील जागा विनामूल्य दिली. प्रमुख सहकारी विजय पोतदार यांचेही सहकार्य लाभले. ज्येष्ठ बांधवाच्या आनंदात ते आपला आनंद मानतात. भोगटेंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. याआधी विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहाण्याचे आवाहन पुरस्कार निवड समिती व कट्टा सेवांगणच्या वतीने किशोर शिरोडकर, विकास म्हाडगुत, श्याम पावसकर, बापू तळवडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Jalna Congress BJP Protest: जालन्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT