कोकण

बांदा बाजारपेठेत दुकानाला आग

CD

72786
बांदा ः येथे उभा बाजारपेठेतील दुकानाला सोमवारी आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले साहित्य. (छायाचित्रे ः नीलेश मोरजकर)

72785
बांदा ः दुकानाचा पंचनामा करताना तलाठी वर्षा नाडकर्णी. शेजारी प्रियांका नाईक, जावेद खतिब आदी.


बांदा बाजारपेठेत दुकानाला आग
मोठे नुकसान; ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे अनर्थ टळला
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ ः शहरातील उभाबाजार बाजारपेठेतील धान्यव्यापारी स्वप्नील वसंत पावसकर यांच्या किराणा दुकानास आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी वेळीच शर्थीचे प्रयत्न करून विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

पावसकर रविवार (ता.१) रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. सकाळी त्यांच्या दुकानाच्या माडीवर शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच आग वाढून सिलिंगला लागली. दुकान बंद असल्याने कोणाला समजले नाही. तेथील धीरज भिसे या मार्गाने जाताना त्यांना दुकानातून धूर दिसला. त्यांनी सर्वांना कऴवले. पावसकरांना बोलावून दुकान उघडण्यात आले. त्यानंतर स्वप्नील पावसकर, भिसे, आशुतोष भांगले, अक्षय गावडे, राकेश केसरकर, साई पावसकर, सायली पावसकर, तसेच अनेक ग्रामस्थांनी तत्काळ पाणी मारून आग विझवली. तरीही किराणा सामान, पैसे, कागदपत्रे फर्निचर, पंखा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. छपराचेही मोठे नुकसान झाले. खालील सामानही पाणी पडून भिजून गेले.
बाजारपेठेतील दुकाने खेटून आहेत. सुदैवानेच आग वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी पंचनामा केला. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतिब यांनी घटनास्थळी भेट दिली. भाऊ वळंजू, सर्वेश गोवेकर, तेजस येडवे, सुनील बांदेकर, ज्ञानेश्वर येडवे आदींसह अनेक ग्रामस्थ मदतकार्यात सहभागी झाले. लवकरच मिनी अग्निशमन बंबासाठी प्रयत्न करू, असे सरपंच नाईक यांनी सांगितले.
दुकानाच्या माडीवरील फॅनला आग लागून शॉर्टसर्किट झाल्याचे निदर्शनास आले. दुकान लाकडी असल्याने लगेच पेट घेतला. दुकानातील कडधान्य मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुकानातील साहित्याचे दोन लाख ३५ हजार, लाकडी बेडचे २० हजार, छपराचे ८० हजार, टेबलचे १५ हजार, फॅनचे दोन हजार असे तीन लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT