कोकण

बांद्यातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करा

CD

73253
सावंतवाडी ः नायब तहसीलदार लता वाडकर यांना निवेदन देताना बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे व सिद्धेश नाईक.
(छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करा

ग्रामस्थांची मागणी ः सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन


सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः येथे होणाऱ्या उड्डाणपुलामुळे रस्त्यालगत असलेली दुकाने व स्टॉल हटविण्यात येणार असल्याने शेकडो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी दुकानदारांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विचार करत त्यांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार यांना देण्यात आले.
तहसीलदार महेश उंडे उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार लता वाडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर धुरी, सिद्धेश नाईक आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, बांदा येथे प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी लगतच्या स्टॉलधारकांना दुकाने काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गेली अनेक वर्षे शेकडो युवकांनी या ठिकाणी स्टॉलची उभारणी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, आता स्टॉल काढण्यात येणार असल्याने या युवकांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या स्टॉलधारकांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे योग्य जागी पुनर्वसन करावे. दरम्यान, नायब तहसीलदार वाडकर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे वरिष्ठांना सादर करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT