कोकण

यशासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक

CD

swt933.jpg
74333
सावंतवाडीः मिलाग्रीसमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जयंत जावडेकर.

यशासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक
जयंत जावडेकरः सावंतवाडीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे. प्रत्येक गोष्ट वास्तवाच्या कसोटीवर तपासून बुद्धिप्रामाण्यवादी बनावे, असे प्रतिपादन पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आज येथे व्यक्त केले. मिलाग्रीस प्रशालेच्या सभागृहात ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याधिकारी जावडेकर यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, मिलाग्रीस हायस्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका मेघना राऊळ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक सालदान्हा यांच्या हस्ते फुलझाड देऊन सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी बोडके यांनी प्रास्ताविकातून विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांचे कौशल्य प्रतिकृतींच्या सादरीकरणातून दिसून येते. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी नाईक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सहशिक्षिका अँथोनिसा फर्नांडिस यांनी करून दिला. सूत्रसंचालन मिलाग्रीस प्रशालेचे सहशिक्षक सुशांत जोशी यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनाला पालक तसेच नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे, असे प्रतिपादन प्रशालेच्या वतीने केले आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT