कोकण

मुणगेत देवी भगवतीचा जयजयकार

CD

74831
मुणगे ः देवी भगवती जत्रोत्सवानिमित्त उभारण्यात आलेले प्रवेशद्वार व भाविकांची झालेली गर्दी. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)

मुणगेत देवी भगवतीचा जयजयकार

जत्रोत्सव उत्साहात; हजारो भाविक दर्शनासाठी देवी चरणी

मुणगे, ता. ११ ः येथील देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. ‘श्री देवी भगवती माते नमो नम:’ या मंत्रघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला. या उत्सवास हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आज पहाटे लळिताच्या कार्यक्रमाने जत्रोत्सवाची सांगता झाली.
मुणगेची ग्रामदेवता देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव १६ ते २० जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जत्रोत्सवाला गावातील मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. गेल्या पाच दिवसांमध्ये हजारो भाविकांनी जत्रोत्सवाला हजेरी लावली. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या देवीच्या जत्रोत्सवात दूरदूरचे भाविक नवस फेडण्यासाठी, नवीन नवस बोलण्यासाठी दाखल झाले. भजनी बुवांनी भजनरुपी सेवा सादर केली. विविध प्रकारचे गायनाचे कार्यक्रम भगवतीच्या चरणी सादर झाले. देवी भगवती देवस्थान समितीतर्फे भाविकांना उत्कृष्ट सेवा दिली. देवी भगवती देवस्थानने देवीच्या अखत्यारित येणाऱ्या देवी बायचे मंदिर नूतनीकरण व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी देणगीदारांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर आदींनी केले आहे. जत्रोत्सवाची सांगता काल (ता. १०) उत्तर रात्रीनंतर बुधवारी पहाटे झाली. भाविकांतर्फे नवस फेडण्यात आले.
............
चौकट
मान्यवरांनी घेतले दर्शन
जत्रोत्सवात वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी देवीचे दर्शन घेतले. यामध्ये आमदार नीतेश राणे, त्यांचे स्वीय सहाय्यक, देवगडच्या तहसीलदार देवगडचे गटविकास अधिकारी, देवगड-कणकवलीच्या प्रांताधिकारी, कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, विविध पक्षांचे तालुकाध्यक्ष आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT