कोकण

रुग्ण आणि वैद्याचे नाते वर्षानुवर्ष टिकावे

CD

rat११२०.txt

बातमी क्र..२० (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat११p३५.jpg ः
७४८४०
शृंगारतळी ः फित कापून रुग्णालयाचे उद्‌घाटन करताना पराग सावंत देसाई, डॉ. विनय नातू आदी मान्यवर.
---
रुग्ण आणि वैद्याचे नाते वर्षानुवर्ष टिकावे

डॉ. विनय नातू ; शृंगारतळीत प्रोलाईफ हॉस्पिटलचे उद्‌घाटन

गुहागर, ता. ११ ः रुग्ण आणि वैद्य यांच नातंसुद्धा वर्षानुवर्ष टिकले पाहिजे तरच या रुग्णसेवेतील चांगल्या गोष्टी आणि घटना पुढच्या काळात सांगता येतील, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले. ते प्रोलाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्‌घाटनसमयी बोलत होते. गुहागर तालुक्यातील पहिल्या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्‌घाटन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक पराग सावंत देसाई यांनी केले.
माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले, गुहागरमध्ये रुग्णालय नाही याची सर्वाधिक जाणीव कोविडच्या काळात झाली. ३५ वर्षांपूर्वी तात्या व माईंच्या इच्छेचा मान राखून एम. एस. झालेल्या डॉ. विवेक नातूंनी घोणसरे येथे रुग्णालय उभे केले. त्यानंतर नव्या पिढीला सर्जन गुहागर तालुक्यात येण्यासाठी ३५ वर्षांचा काळ लोटला. आज याच गावातील एक तरुण पुन्हा एकदा गुहागरवासीयांना रुग्णसेवा देण्यासाठी शृंगारतळीत रुग्णालय उभे करत आहे, ही कौतुकाची बाब आहे.
पराग सावंतदेसाई म्हणाले, डॉ. सचिन त्याची पत्नी डॉ. अश्विनी वैद्यकिय क्षेत्रात उच्च विद्याविभुषित होऊन पुन्हा गुहागरमध्ये आल्या, याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. सचिन ओक म्हणाले, कितीही शिक्षण घेतले तरी गुहागरमध्येच सुसज्ज रुग्णालय उभे करायचे हे आधीपासूनच मी ठरवले होते. यावेळी उद्योजक मोहन संसारे, शाळीग्राम खातू, राजन दळी, रघुशेठ ओक, शोएब मालाणी, सुरेंद्र मर्दा, अरुण परचुरे, यशवंत बर्वे, अरुण गांधी, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. अनिकेत गोळे, डॉ. मंदार आठवले, अरुण ओक, लक्ष्मण शिगवण, माजी सरपंच संजय पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

SCROLL FOR NEXT