कोकण

‘खरेदी विक्री’तज्ज्ञ संचालकपदी लोंढे, पेडणेकर

CD

- अभिमन्यू लोंढे
- गुरुनाथ पेडणेकर
---

‘खरेदी विक्री’तज्ज्ञ संचालकपदी लोंढे, पेडणेकर

सावंतवाडीत निवड; पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः येथील खरेदी विक्री संघाच्या त संचालकपदी पत्रकार अभिमन्यू लोंढे आणि गुरूनाथ पेडणेकर यांची आज निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे नाव राज्यात पोहचवावे, जास्तीत जास्त शेतकरी बागायतदारांना फायदा मिळवून द्यावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी केले.
येथील खरेदी विक्री संघाची निवडणूक अलिकडेच पार पाडली. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडही झाली. त्यानंतर आज तज्ज्ञ संचालक म्हणून माजी अध्यक्ष असलेले लोंढे आणि पेडणेकर यांना संधी देण्यात आली. ही प्रक्रिया खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रविण देसाई, दत्ताराम कोळमेकर, ज्ञानेश परब, शशिकांत गावडे, भाई राऊळ, आत्माराम गावडे, भगवान जाधव आदी उपस्थित होते. यावेळी श्री. तेली यांनी दोन्ही संचालकांना शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, ‘‘जिल्हा सहकार क्षेत्रात आघाडीवर आहे. प्रत्येक तालुक्यातील संघाचे काम दिवसेंदिवस उंचावत आहेत. तेथे कुठल्याही प्रकारचे राजकारण न पाहता शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले जाते. असेच काम सावंतवाडी संघाकडून होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्यात असलेल्या सत्तेचा वापर करा. आम्ही सहकार्य करू. याठिकाणी शेतकरी आणि बागायतदारांच्या विविध अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सोसायट्यांसह जिल्हा बँक सुध्दा भाजपाच्या ताब्यात आले. आता या ठिकाणी तज्ञ संचालक म्हणून दोन संचालक घेण्यात आले आहे. त्याचा फायदा खरेदी विक्री संघाच्या भल्यासाठी होण्याबरोबर याठिकाणी अवलंबून असलेल्या अन्य सदस्यांना सुध्दा त्याचा फायदा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि ते होतील." यावेळी उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्वच संचालक मंडळाकडुन आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

PMP Bus: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान; पीएमपीत १५९९ बस दाखल, मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार अर्थसंकल्पात जाहीर

SCROLL FOR NEXT