कोकण

इन्सुली उपसरपंचपदी भाजपचे कृष्णा सावंत

CD

75645
इन्सुली ः उपसरपंच कृष्णा सावंत यांचे अभिनंदन करताना गुरुनाथ पेडणेकर, मानसी धुरी. शेजारी इतर.

इन्सुली उपसरपंचपदी
भाजपचे कृष्णा सावंत
बांदा, ता. १५ ः इन्सुलीच्या उपसरपंच निवडणुकीत भाजपच्या कृष्णा सावंत यांनी आघाडीच्या आरती परब यांचा ६ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला. ग्रामपंचायत कार्यालयात आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. उपसरपंच रामचंद्र चराटकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.
काही दिवसांपूर्वीच कृष्णा सावंत यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे संख्याबळ वाढले होते. त्यामुळे उपसरपंच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सावंत यांना ६, तर परब यांना ४ मते मिळाली. एक मत बाद झाल्याने सावंत हे २ मतांनी विजयी झाले. नवनिर्वाचित उपसरपंच सावंत यांचा माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, जिल्हा ओबीसी सेल सचिव विकास केरकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता खडपकर, स्वागत नाटेकर, वर्षा सावंत, नमिता नाईक, राधिका देसाई, ज्ञानेश्वर राणे, महेश धुरी, साबाजी पालव, महेंद्र पालव, रवी परब, सचिन दळवी, विवेकानंद नाईक, प्रकाश आईर, हरिश्चंद्र तारी, औदुंबर पालव, बापू कोठावळे, प्रदीप सावंत, प्रताप सावंत, शक्तिकेंद्र प्रमुख नितीन राऊळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT