कोकण

भास्कर जाधव

CD

rat१६३९.txt

( पान ३ साठीमेन)

फोटो ओळी
-rat१६p३४.jpg ः
७५९९९
दापोली ः पत्रकार परिषदेत बोलताना आमदार भास्कर जाधव.
--
विश्वासघात केलेल्याना मातीत घालायचेच...

आमदार भास्कर जाधव ; दापोलीत भगव्या सप्ताहाला सुरवात
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १६ ः या मतदारसंघातील ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला त्यांना भविष्यात मातीत घालायचेच या निर्धाराने आजपासून दापोली मतदारसंघात भगव्या सप्ताहाला सुरवात झाली, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर गेल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार जाधव म्हणाले, बैल गेला नी झोपा केला अशीच अवस्था आहे. राज्यातील लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर अन्य राज्यात गेले असून लाखो तरुणांच्या तोंडातील घास या सरकारने काढून घेतला आहे. त्यानंतर यापेक्षा मोठे प्रकल्प हे आम्हाला देशाचे पंतप्रधान मोदी देणार आहेत. मोदी यांचे एवढे मोठे मन नाही की, ते गुजरात सोडून महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देतील. महाराष्ट्राला खिळखिळे करणे, महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ती दुबळी करून राज्याचे महत्व कमी करणे अशाच प्रकारचा कार्यक्रम केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीने हाती घेतला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री दावोसला गेले का की अन्य ठिकाणी गेले तरी काही हाताला लागणार नाही. त्यांची केवळ ट्रीप होईल.

कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर शेतकरी सदस्यांमधून कोकणाबाहेरील शेतकऱ्यांची नियुक्ती कृषिमंत्री यांनी केली आहे. त्याबद्दल बोलताना जाधव म्हणाले, या संदर्भात आपण विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. तुम्ही काय काय चोरून नेणार आहात महाराष्ट्रातून? आता आमच्या विद्यापीठाचे सदस्यही तुम्ही चोरून नेत आहात, असे सभागृहात विचारले त्या वेळी सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते; मात्र कोणीही याचा प्रतिवाद केला नाही. आम्ही संघर्ष करत आहोत; मात्र प्रत्येक बाबतीत कोकणावर अन्याय करण्याची पद्धत अजूनही सुरूच आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या भागावर अन्याय झाला की, त्या अन्यायाविरोधात ज्या तडफेने, ज्या आक्रमकपणे तुटून पडायला पाहिजे तसे पडत नाहीत. मी हा प्रश्न विचारला तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्रीही सभागृहात होते; मात्र तेही तेव्हा काही बोलले नाहीत.
---
मेळावा न होता मेलावा झाला
माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागर मतदारसंघात नुकताच मेळावा घेतला. त्या संदर्भात ते म्हणाले, तो मेळावा न होता मेलावा झाला. त्याची संध्याकाळी ५ ची वेळ होती; मात्र रामदास भाई यांना ८ वा. यावे लागले. तेथे कदम यांनी पुढचा आमदार शिंदे गटाचा असेल सांगत उमेदवार म्हणून बेटकर यांचे नाव घोषित केले. दापोलीत आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या सभेत व्यासपीठावर भाजपचे केदार साठे यांना सांगितले, डॉ. विनय नातू यांना निरोप द्या की तुम्ही कामाला लागा. आता म्हणतात, बेटकर यांना निवडून आणतो.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT