कोकण

राष्ट्रीय युवक दिन

CD

rat१७१७.txt

(टुडे पान २ संक्षिप्त)

चिपळूणात भाजपातर्फे राष्ट्रीय युवक दिन

चिपळूण ः राष्ट्रीय युवकदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चिपळूण आणि अपरांत हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पार्टी मार्कंडी कार्यालय येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले गेले होते. या वेळी डॉ. गौतम कुलकर्णी यांनी विविध आजार तसेच अपघातांवेळी प्रथमोपचार कसे केले जावेत याचे सखोल मार्गदर्शन केले. त्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात काम करत असताना असे प्रसंग वेळोवेळी येत असतात त्या वेळी ती स्थिती कशी हाताळायची याबद्दल विवेचन करून कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, शहराध्यक्ष आशिष खातू , माजी नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, अपरांत हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी अमर भोसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मंदार कदम यांनी केले.
---

स्व. गोविंदराव निकमांना मानवंदना

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) या प्राथमिक विद्यालयात सह्याद्री शिक्षणसंस्थेचे संस्थापक स्व. गोविंदराव निकम जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून स्व. निकम जयंती अशी कलाकृती शाळेच्या पटांगणात करून मानवंदना दिली. जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या हस्ते स्व. गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी शौर्य पोटे, वेदांत महाडीक या विद्यार्थ्यांनी स्व. गोविंदरावजी निकम यांच्याविषयी भाषणे केली. शिक्षिका विनया नटे यांनी स्व. निकम यांचा इतिहास मनोगतातून उलगडून दाखवला. सूत्रसंचलन मनीषा कांबळी यांनी केले.
---

डबरची कवडीमोलाने विक्री?

संगमेश्व ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गावमळा येथे रस्त्यावरील डबर हा जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने पुन्हा उचलला जात आहे आणि लाखो रुपयांचा डबर कवडीमोलात विकला जात आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाचशे ब्रास डबरची रॉयल्टी भरून हजारो ब्रास डबर लंपास करण्यात येत आहे. याला महसूलचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी लॉकडाउनचा फायदा घेऊन बिनधास्तपणे घेऊन जात असल्याचे निदर्शनास येत होते. लाखो रुपयांचा महसूल चुकवून हा डबर कुठे जात आहे, याची महसूल प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर हा डबर तेथेच ठेवण्यात आला होता.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT