कोकण

भाजी विक्रेत्यांसाठी वेंगुर्लेत पर्यायी व्यवस्था

CD

swt1737.jpg
76341
वेंगुर्लेः येथील बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांना नियोजनबद्ध बसविले होते.

भाजी विक्रेत्यांसाठी
वेंगुर्लेत पर्यायी व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १७ः येथील नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी येथील बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे मार्केटसमोर होणारी वाहतुक कोंडीची समस्या टळली असल्याचे दिसून येत आहे.
येथील भाजी विक्रेते मंडईमध्ये न बसता मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसायचे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत असे. या वाहतुक कोंडीवर उपाययोजना म्हणून मुख्याधिकारी कंकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व भाजी विक्रेत्यांना पवनपुत्र भाजी मंडईमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व भाजी विक्रेत्यांना योग्य ती जागा आखून देण्यात आल्यामुळे मंडईमध्ये योग्यप्रकारे व्यवस्थापन होत आहे. आठवडा बाजारादिवशी विक्रेत्यांना नियोजित ठिकाणी बसविण्यात आला. त्यामुळे गाडीअड्डा ते लकी स्टोअर्स आणि मुख्य बाजारपेठ रस्ता या ठिकाणी वाहतुक सुरळीतपणे सुरु राहिली. मुख्याधिकारी कंकाळ यांच्या नियोजनबद्ध कामाबद्दल शहरातील नागरिक, प्रवासी, वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

SCROLL FOR NEXT