कोकण

फोवकांडा-पिंपळपार रस्त्याची दुरवस्था

CD

77140
मालवण ः फोवकांडा-पिंपळपार रस्त्याबाबत माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना निवेदन दिले.

फोवकांडा-पिंपळपार रस्त्याची दुरवस्था

डांबरीकरणाची मागणी; जावकर यांचे मालवणात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मालवण, ता. २१ : शहरातील मेढा भागातील फोवकांडा पिंपळपार ते ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. डांबरीकरण न झाल्यास आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही दिला आहे.
यावेळी जावकर यांच्या समवेत शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, बंड्या सरमळकर, नितीन मांजरेकर, राजू जोशी, सचिन गिरकर, बाबू वाघ आदी उपस्थित होते. श्री. जावकर यांनी फोवकांडा पिंपळपार ते ग्रामीण रुग्णालय रस्त्याच्या अवस्थेबाबत मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शहरातील बहुतेक गल्लीबोळातील रस्त्यांची डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत; परंतु मेढा विभागातील ग्रामीण रुग्णालय ते सादले तिठा या महत्त्वाच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी, रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहन धारकांना त्रास सोसावा लागत आहे. हा रस्ता ग्रामीण रुग्णालयाजवळ जात असल्याने मेढा, राजकोट येथील रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला हा मार्ग जय गणेश मंदिर, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाण्याकडे जाणारा असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे डांबरीकरण करणे गरजेचे आहे; मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्ता खड्डेमय राहिला आहे. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे; अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असे जावकर यांनी सांगितले. याबाबत योग्य ती कार्यवाही करून रस्त्याचे काम करू, अशी ग्वाही मुख्याधिकारी जिरगे यांनी दिली.
..................
मोकाट गुरांचा बंदोबस्त करा
शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला असून यामुळे वाहनचालक तसेच पर्यटकांना त्रास होत आहे. त्यामुळे गुरे मालकांना आपली गुरे सांभाळण्याबाबत पालिकेने सूचित करून प्रसंगी कारवाई करावी, अशी मागणी जावकर यांनी केली. बोर्डिंग ग्राउंड येथे बसविण्यात आलेल्या ओपन जिमचे काही साहित्य नादुरुस्त बनले असून त्याबाबत लक्ष देऊन साहित्य पूर्ववत करावे, अशी मागणीही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT