कोकण

विविध कलागुणांमुळे चांगला माणूस घडतो

CD

77806
नडगिवे : येथील इंग्‍लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन अभिनेते श्रेयस तळपदे यांनी केले. यावेळी अंकिता प्रभुवालावलकर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)


विविध कलागुणांमुळे चांगला माणूस घडतो

अभिनेते श्रेयश तळपदे : नडगिवे येथील इंग्‍लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन

खारेपाटण, ता.२३ : नियमित अभ्यासासह विविध कलागुणांचीही जोपासना विद्यार्थ्यांनी करायला हवी. त्‍यामधून चांगला माणूस घडतो, असे प्रतिपादन अभिनेते श्रेयस तळपदे यांनी केले.
नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कृलचे स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन अभिनेते तळपदे यांनी केले. या कार्यक्रमावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अभिनेत्री अंकिता प्रभूवालावलकर, नॅशनल स्कूलचे अध्यक्ष मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष रघुवीर राणे, परवेज पटेल, प्रविण लोकरे, मोहन कावळे, विजय कलंत्रे, राजेंद्र ब्रम्हदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात श्रेयश तळपदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्‍या विद्यार्थ्यांचा सत्‍कार करण्यात आला. श्‍याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
--
इतर मान्यवरांची मनोगते
पोलिस अधीक्षक श्री.अग्रवाल म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणाचा पाया मजबूत आहे. इथल्‍या प्रत्‍येक शाळेत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात हे पाहून मोठे समाधान वाटते.’’ अंकिता प्रभू वालावकर म्हणाल्या, ‘‘जगभरात मालवणी भाषेचा मोठा चाहता वर्ग आहे. त्‍यामुळेच मालवणी भाषेतून केलेल्या रिल्सना प्रसिद्धी मिळत आहे. त्‍यामुळे प्रत्‍येकाने बोली भाषेचा आदर करायला हवा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT